तळेगाव ठाकूर : येथील प्रभू गोमासे यांच्या घरी सिलिंडर स्फोट होऊन घर बेचिराख झाल्याने त्यांचे कुटुंब पूर्णपणे उघडे पडले होते. त्या कुटुंबाला पालकमंत्री यशोमती ठाकूर मित्रमंडळाने तातडीने मदतीचा हात दिला. राजीव ठाकूर व सुरेश साबळे यांच्या हस्ते नुकसानग्रस्त प्रभू उत्तम गोमासे यांना धनादेश देण्यात आला. धान्य, कपडे, साड्या, किराणा, जीवनावश्यक वस्तूसोबतच वापरण्याकरिता लागणारी भांडीसुध्दा देण्यात आली.
यावेळी पंचायत समितीचे उपसभापती शरद वानखडे, कल्पना दिवे, सरपंच दर्शना मारबद, सतीश पारधी, महादेवराव पाटील, जितेंद्र बायस्कर, राजू थोरात, पोलीस पाटील किशोर दिवे, श्याम निमावत, नानासाहेब भुरे, रुपाली गोडबोले, निर्मला कातोरे, मंगेश राऊत, दिलीप वानखडे, मधुकर हरणे, नितीन कळमकर, कल्याण पाटील, सुधीर काळे, समीर पठाण, अक्षय पवार, अनिकेत बादशे, मोहित मोटघरेसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.