रणजित पाटील : 'देख भाई देख' अपघात निर्मूलन कार्यक्रमअमरावती : बरेचदा पोलिसांच्या भीतीपोटी अपघातात सापडलेल्या अपघातग्रस्तांना मदत करण्याची मानसिकता नागरिकांची होत नाही. परंतु पोलिसांबदल मनात कुठलीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना मदत करा, त्यांना त्वरित उपचारासाठी दवाखान्यात पोहोचवा. जेणेकरून जखमींचे प्राण वाचू शकेल. या कार्यात मी तुमच्या पाठीशी आहे, असे प्रतिपादन गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी केले. येथील सुयश हॉस्पिटलद्वारे टॉऊन हॉल येथे आयोजित 'देख भाई देख' या अपघात निर्मूलन व मार्गदर्शन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. अपघात झाल्यास काय केले पाहिजे. अपघात टाळण्यासाठी करावयाची उपायोजना यासंदर्भात मान्यवरांना मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष गृहराज्यमंत्री रणजित पाटील होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी महणून जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, हव्याप्र मंडळाचे प्रधान सचिव प्रभाकरराव वैद्य, आ. यशोमती ठाकूर, आ. अनिल बोंडे, सुयश हॉस्पिटलचे संचालक सुरेश सावदेकर, सुमंगला सावदेकर, सीएस अरुण राऊत, माधुरी चेंडके आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी किरण गित्ते व पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक कांचन सावदेकर यांनी केले. संचालन मनीष तवारी यांनी, तर आभार अस्थीरोग तज्ज्ञ ऋषिकेश सावदेकर यांनी केले. न्युरोलॉजिस्ट योगेश सावदेकर व राधा सावदेकर यांनी मार्गदर्शन केले.
कुठलीही भीती न बाळगता अपघातग्रस्तांना मदत करा
By admin | Updated: November 6, 2016 00:13 IST