शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

पुनर्वसितांच्या नरकयातना : आठ गावांत जन्म-मृत्युची नोंद घ्यायला कुणी नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 16:36 IST

चिखलदरा, दि. 21 :  व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी आमच्यासोबत इंग्रजांसारखे वागले. आम्ही मेळघाटातून पुनर्वसित व्हायला तयार नसल्याने त्यांनी डिव्हाईड अँड रूलची नीती वापरली. ते मध्यरात्री गावात येऊन शिवीगाळ करायचे. अशाप्रकारे त्रास देऊन त्यांनी आम्हाला गाव सोडण्यास बाध्य केले. असा टाहो फोडत तुलसी जावरकर, रेखा बेठेकर यांच्यासह उपस्थित महिलांनी अडचणींचा पाढाच वाचला. ...

चिखलदरा, दि. 21 :  व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी आमच्यासोबत इंग्रजांसारखे वागले. आम्ही मेळघाटातून पुनर्वसित व्हायला तयार नसल्याने त्यांनी डिव्हाईड अँड रूलची नीती वापरली. ते मध्यरात्री गावात येऊन शिवीगाळ करायचे. अशाप्रकारे त्रास देऊन त्यांनी आम्हाला गाव सोडण्यास बाध्य केले. असा टाहो फोडत तुलसी जावरकर, रेखा बेठेकर यांच्यासह उपस्थित महिलांनी अडचणींचा पाढाच वाचला. बुधवारी पुनर्वसित केलापानी गावात आठही गावांतील आदिवासींच्या बैठकीत हा प्रकार उघडकीस आला.चिखलदरा तालुक्यातील केलपानी, गुल्लरघाट, सोमठाणा खुर्द, सोमठाणा बु., अमोना, धारगड, नागरतास व बारूखेडा याआठ गावांचे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून पुनर्वसन करण्यात आले. या आठ गावांची लोकसंख्या जवळपास साडेपाच हजार आहे. त्यात केलपाणी, बारूखेडा गावाची लोकसंख्या सर्वाधिक आहे. गेल्या अनेक पिढ्यांपासून जंगलात वसलेल्या या आदिवासींची अवस्था सद्यस्थितीत पाण्याविना तडफडणा-या मासोळीसारखी झाली आहे. पुनर्वसनाच्या वेळी या ग्रामस्थांना दिलेली आश्वासने कागदोपत्रीच असून त्यांची पूर्तता झालेली नाही. या संतप्त पुनर्वसितांनी परतीचा निर्धार केल्याने आता प्रशासनाच्या पायाखालची वाळू सरकली आहे.२२८ जणांच्या मृत्युची नोंद नाहीवीज, रस्ता, पाणी, आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा सर्वप्रथम पुनर्वसित आठ गावांना पुरविणे आवश्यक होते. मात्र, त्या सुविधा त्यांना मिळाल्याच नाहीत. उलट या चार वर्षांत या पुनर्वसित गावांमध्ये झालेल्या २२८ जणांच्या मृत्युची नोंदही कुठेच नाही. बुधवार १६ आॅगस्टला पुनर्वसित केलपानी येथे झालेल्या आठही गावांतील आदिवासींच्या बैठकीत हा आकडा पुढे आला. मृतांचा हा आकडा प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. गुल्लरघाट व धारगड येथे कागदोपत्रीच ग्रामपंचायत कार्यालय सुरू आहे.केव्हा होणार आरोग्य केंद्र ?पुनर्वसित गावांमध्ये सर्वप्रथम आरोग्याची व्यवस्था पाहता आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र उघडण्याचे सौजन्य या पाच वर्षांत प्रशासनाने दाखविले नाही. परिणामी कुपोषित बालक, युवक, वयोवृद्धांच्या आरोग्यावर परिणाम झाला आणि मृत्युचे तांडव सुरू झाले. या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करणाºया प्रशासनाविरूद्ध आदिवासींमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे.

साहेब, नवरा मेला; आता तरी पैसे द्याधारगड येथून स्थलांतरित झालेल्या संगीता नागनाथ ठाकरे (२८) हिच्या पतीचे आजाराने निधन झाले. उपचारासाठी मदत मिळावी म्हणून तिने संबंधितांच्या पायºया झिजविल्या. मात्र, पतीचा मृत्यू झाल्यानंतरही अधिकाºयांना घाम फुटला नाही. आता संगीता चार वर्षांचा दिव्यांग गणेश आणि अडीच वर्षांचा श्रीकृष्ण अशी दोन मुले घेऊन जगत आहे. पोटच्या मुलांना जगविण्यासाठी तरी द्या, नाही तर मारून टाका म्हणत तिने आपली व्यथा उपस्थितांसमोर मांडताच अनेकांची मने हेलावली.

पुनर्वसित गावांमध्ये आरोग्य सुविधा, ग्रामपंचायत कार्यालय आदी सर्व सुविधा पुरविल्यासंदर्भात अकोला जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार केला आहे.- प्रमोद लाकरा, उपवनसंरक्षक, अकोट वन्यजीव विभाग