शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2022 05:00 IST

मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी बुधवारी दुपारी ३ वाजता धामणगाव तालुक्यात मृगाच्या पावसाने हजेरी लावली.  ढगांच्या गडगडाटात वादळी पावसामुळे बुधवारी जळका पटाचे येथील अनेक घरांचे नुकसान झाले. यात घरावरील टिनपत्रे उडून गेले, तर अनेक कुटुंबे बेघर झाली. याच वेळी आसेगाव येथील समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावरील कपड्याचे  छतही  फाटले गेले.  दुसऱ्या दिवशी ही गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस आला.

लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : मागील दोन दिवसांपासून मृग नक्षत्र सुरुवातीपासून वादळी पाऊस आणि धारदार सरी सायंकाळी  कोसळत असल्या तरी मृगाचा किडा बेपत्ता झाला आहे . मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी बुधवारी दुपारी ३ वाजता धामणगाव तालुक्यात मृगाच्या पावसाने हजेरी लावली.  ढगांच्या गडगडाटात वादळी पावसामुळे बुधवारी जळका पटाचे येथील अनेक घरांचे नुकसान झाले. यात घरावरील टिनपत्रे उडून गेले, तर अनेक कुटुंबे बेघर झाली. याच वेळी आसेगाव येथील समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावरील कपड्याचे  छतही  फाटले गेले.  दुसऱ्या दिवशी ही गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ढगांच्या गडगडाटासह वादळी पाऊस आला. अंजनसिंगीसह धामणगाव तालुक्यातील सर्वदूर गावांत  या पावसाने हजेरी लावली.धामणगाव रेल्वे तालुक्यातील अंजनसिंगी येथे गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजतापासून वादळी पावसाला सुरुवात झाली. चांदुर रेल्वे परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस बरसला. भातकुली तालुक्यातील वाठोडा शुक्लेश्वर परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अचलपुरात वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस कोसळला. यामुळे उष्म्याने अक्षरश: भाजून निघालेल्या जिल्हावासीयांना दिलासा मिळाला. अमरावती शहरात रात्री ८ च्या सुमारास पाऊस कोसळला. त्यापूर्वी आकाश ढगांच्या दाटीने काळेकुट्ट झाले होते. तथापि, अपेक्षेएवढा पाऊस कोसळला नाही. मृगाच्या सरींमध्ये मनसोक्त भिजण्याचा अमरावतीकरांचा मनसुबा अद्याप फळाला आलेला नाही. त्याअनुषंगाने कृषि विभागानेही खबरदारीचा उपाय सुचविला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सोयाबीन बियाणांच्या पेरणीबाबत घाई करु नये, यासाठी शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे.विदर्भाचे नंदनवन चिखलदऱ्यातही गुरुवारी रात्री पावसाने हजेरी लावली. यावेळी रस्त्याच्या कडेला सखल भागात पावसाचे पाणी जमा झाले. पावसामुळे गारवा निर्माण झाला होता.

परतवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस

परतवाडा : परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरासह परिसरातील ग्रामीण भागात गुरुवारी सायंकाळी सात वाजता माॅन्सूनच्या पहिल्या पावसाने हजेरी लावली. सरीवर सरी कोसळल्याने रस्त्याने पाणी वाहिले. देवमाळी व परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला होता. अचलपूर कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचे धान्य शेडमध्ये ठेवले होते. परंतु काही बाहेर ठेवलेल्या धान्याच्या पोत्यांवर ताडपत्री झाकून ते सुरक्षित करण्यात आले. पावसाच्या सरी कोसळल्याने उकाडा मात्र वाढला होता.

 

टॅग्स :Rainपाऊस