शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

तीन महसूल मंडळांत अतिवृष्टी तहानलेल्या पिकांना जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 15:37 IST

४८ तासांपासून रिपरिप : जिल्ह्यात खरिपाचा पेरणीचा टक्का ८२ वर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. यामध्ये तीन महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली. सद्यःस्थितीत नऊ तालुक्यांत पावसाची सरासरी माघारली आहे. या पावसाने यापूर्वी पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले. तर, पावसाअभावी रखडलेल्या पेरण्यांची वाट मोकळी झालेली आहे. जिल्ह्यात सद्यःस्थितीत ५.५८ लाख हेक्टरमध्ये म्हणजेच ८२ टक्के क्षेत्रात खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहे. 

मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर आर्द्रामध्ये गावात आहे तर शिवारात नाही, अशी अवस्था राहिली. त्यामुळे खरिपाच्या पेरण्या रखडल्या होत्या. आता शुक्रवारपासून पुनर्वसू नक्षत्राला सुरुवात झाली व वाहन हत्ती आहे. या काळात दमदार पावसाची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. रखडलेल्या पेरणीसोबतच पहिल्या टप्प्यातील पिकांच्या वाढीसाठी हा पाऊस पोषक ठरणारा आहे.

जिल्ह्यात १२ जून रोजी मान्सूनची एंट्री झाली व त्याच दिवसापासून वाटचाल मंदावली होती. त्यामुळे जिल्ह्यात पावसाची तूट आहे. ९ जुलैपर्यंत २२६.२ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २१०.८ मिमी पावसाची नोंद झाली. ही ९३.२ टक्केवारी आहे.

सद्यःस्थितीत सरासरीच्या सर्वात कमी ४९.६ टक्के पाऊस धारणी तालुक्यात नोंद आहे. याशिवाय अमरावती, अचलपूर, चिखलदरा, भातकुली, तिवसा, मोर्शी, वरुड व धामणगाव रेल्वे तालुक्यांत सरासरीच्या कमी पाऊस झालेला आहे. गतवर्षी याच तारखेला १३१.८ मिलिमीटर म्हणजेच ५८ टक्के पावसाची नोंद झाली होती. हवामान विभागाने आता १२ जुलैपर्यंत हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविली आहे.

अमरावती, रामतीर्थ, रासेगाव मंडळांत 'जोर'धारजिल्ह्यात ४८ तासांत अमरावती महसूल मंडळात ६७.३ मिलिमीटर व दर्यापूर तालुक्यातील रामतीर्थ मंडळात ८३.८ व रासेगाव ६८.३ मिलिमीटर पाऊस झाल्याने अतिवृष्टीची नोंद झालेली आहे. याशिवाय २४ तासात चिखलदरा व अमरावती तालुक्यात दमदार पावसाची नोंद झालेली आहे. सलग दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने शहरातील नाल्या तुंबल्याने अनेक भागात पाणी साचले होते.

खरिपाची ८२ टक्के क्षेत्रात पेरणी, सर्वाधिक सोयाबीनजिल्ह्यात सरासरी ६.८२ लाख हेक्टरच्या तुलनेत ५.५८ लाख हेक्टरमध्ये सद्यःस्थितीत पेरणी आटोपली आहे. यामध्ये सोयाबीनची सर्वाधिक २.२५ लाख हेक्टर, कपाशी २ लाख हेक्टर व तुरीची ९८ हजार हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. त्या तुलनेत गतवर्षी याच तारखेला २.८० लाख हेक्टरमध्ये पेरणी झाली होती. या आठवड्यात जिल्ह्यातील पेरण्या पूर्णत्वाकडे जातील, असे कृषी विभागाने सांगितले. 

टॅग्स :farmingशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रAmravatiअमरावती