शहरं
Join us  
Trending Stories
1
'हा' काय घोळ? पश्चिम बंगालच्या डॉक्टर कुटुंबाचे नाव थेट बांगलादेशच्या मतदार यादीत!
2
IND vs AUS 1st ODI : गिलच्या कॅप्टन्सीत या युवा क्रिकेटरला पहिली संधी; रोहितनं दिली वनडे डेब्यू कॅप
3
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
4
क्रिकेटपटूंचा जीव घेतल्यानंतर पाकिस्तानचा अफगाणिस्तानसोबत युद्धविराम; या दोन देशांची मध्यस्थी...
5
नाशिकजवळ धावत्या एक्स्प्रेसमधून तिघे फेकले गेले, दोघांचा मृत्यू; अपघातग्रस्त प्रवाशांची ओळख पटेना
6
आजचे राशीभविष्य १९ ऑक्टोबर २०२५ : ९ राशींसाठी आजचा दिवस फलदायी, धनलाभ होणारा...
7
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुबत्ता, नवीन नोकरीची संधी, शासकीय लाभ; दिवाळीत हाती पैसा!
9
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
10
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
11
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
12
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
13
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
14
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
15
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
16
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
17
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
18
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
19
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
20
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह

अमरावती जिल्ह्यात तिवसा, वरूडला वादळी पावसाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 20:32 IST

अमरावती जिल्ह्यात शनिवारी दुपारी ३ ते ३.३० वाजता दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस कोसळला. तालुक्यातील उंबरखेड येथील नरेंद्र कळंबे यांच्या शेतातील संत्राझाडे जमीनदोस्त झाली.

ठळक मुद्देसंत्रा, कपाशी, तुरीचे नुकसानझाडे उन्मळून पडली

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शनिवारी दुपारी तिवसा व वरूड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळला. यात शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. कपाशी झोपली. अनेक शेतातील संत्राझाडे कोलमडली, तर सोसाट्याच्या वाऱ्यामुळे संत्राफळांचा अक्षरश: सडा पडला. काढणीवर आलेले सोयाबीन मातीमोल झाले. कपाशी आडवी झाल्याने बोंडे गळाली. मोर्शी, अचलपूर, चांदूर बाजार, अमरावती, भातकुली, दर्यापूर तालुक्यातील तुरळक ठिकाणी, अंजनगाव सुर्जी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. मात्र, नुकसान झाल्याचे वृत्त नाही.

शनिवारी दुपारी ३ ते ३.३० वाजता दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पाऊस कोसळला. तालुक्यातील उंबरखेड येथील नरेंद्र कळंबे यांच्या शेतातील संत्राझाडे जमीनदोस्त झाली. आंबिया बहर गळून पडला. जमिनीवर संत्र्यांचा सडा पडला होता. तसेच बबलू मुंद्रे यांची कपाशी वाºयाने झोपली. सोयाबीन आता काही दिवसांत काढणीला येणार आहे. यात पाऊस आल्याने सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्यातील वरखेड व कुºहा महसूल मंडळातील मार्डा, कौंडण्यपूर, मूर्तिजापूर, तरोडा, वंडली व शिदवाडी गाव शिवारांमध्ये शनिवारच्या पावसाने कहर केला. सुमारे २०० ते ३०० हेक्टरमधील पिके जमीनदोस्त झाली. वरूड तालुक्यात शनिवारी दुपारच्या सुमारास आलेल्या वादळी पावसामुळे संत्राफळे गळली. कपाशी, तूर, ज्वारी, मका झोपला. दोन तास बरसलेल्या वादळामुळे अनेक झाडे उन्मळून पडली.

काही घरांचे छत उडाले. ऐन उमेदीच्या काळात शेतातील ज्वारी, तूर, कपाशी वादळी पावसाने जमीनदोस्त झाली. शेंदूरजनाघाट, तिवसाघाट, टेंभूरखेडा, गव्हाणकुंड, लोणी, बेनोडा, वरूड, जरूड, पुसला, मांगरूळी, करजगाव, राजूराबाजार, वाडेगाव, उदयपूर, देऊतवाडा, धनोडी, मालखेड, सातनूर, वाई, रवाला या परिसरातील शेतातील पिकांचे नुकसान झाले. वरूड शहरातील दोन आणि लोणी येथील चार घरांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्याचा वेग अधिक असल्याने शेती पिकाचे नुकसान झाले. विद्युत खांबसुद्धा वाकले. रस्त्यावर पडलेली झाडे उचलण्याचे काम पालिकेकडून सुरू आहे.तालुक्यातही नुकसानीचे सर्वेक्षण करून अहवाल पाठविणार वरूड तालुक्यात वादळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळाली. वरूड व लोणी येथील चार घरे पडली. रस्त्यावरची झाडे उन्मळून पडली. विद्युत खांब वाकले. तलाठ्यांना शेतीपिकाबाबत माहिती घेऊन अहवाल देण्याची सूचना केली.- सुनील सावंत, तहसीलदार

टॅग्स :Rainपाऊस