शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या दिवशीही पावसाची जिल्ह्यात जोरदार हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2021 05:01 IST

नांदगाव परिसरात शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनची कापणी केली. मात्र, कालपासून होत असलेल्या पावसाने शेतात पाणी साचले. कापलेले सोयाबीनचे गंज पावसात भिजले. त्यास अंकुर फुटण्याची भीती आहे. आधीच  मजूर मिळत नसल्याने मजुरी वाढली. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी सभापती फिरोज खान यांनी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव खंडेश्वर/धारणी : मान्सूनच्या अखेरीस आता होत असलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्यातील काही भाग झोडपून काढले. अमरावती शहरासह जिल्हाभरात शनिवारी रात्रभर कोसळलेल्या पावसाने शेतात पाणीच पाणी झाले. त्यामुळे सोयाबीनचे मातेरे झाले. त्यासोबतच कापूसही भिजला आहे. संत्राउत्पादकांनाही शेतात फळांचा सडा पहावा लागत आहे. नांदगाव परिसरात शेतकऱ्यांनी शेतात सोयाबीनची कापणी केली. मात्र, कालपासून होत असलेल्या पावसाने शेतात पाणी साचले. कापलेले सोयाबीनचे गंज पावसात भिजले. त्यास अंकुर फुटण्याची भीती आहे. आधीच  मजूर मिळत नसल्याने मजुरी वाढली. शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी माजी सभापती फिरोज खान यांनी केली आहे.धारणी परिसरातही पावसाने सोयाबीन, कपाशी आणि तिवसा, चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वेसह जिल्हाभरातील बागायती संत्रा व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कपाशीची शेते पांढरी शुभ्र झाली आहेत. परंतु, वेचण्याकरिता मजूर मिळत नसल्यामुळे तो ओला होऊन मातीमोल झाल्याचे दिसून येत आहे. संत्र्याची आंबिया बहराची फळे गळाली आहेत. त्यांचा सडा झाडाखाली दिसून येत आहे. शेंदोळा येथील एका शेतकऱ्याचे चार एकरातील कापलेले सोयाबीन पाण्यावर तरंगले. शिरजगावात संत्र्याचा सडा पडला. दरम्यान, अमरावती, अचलपूर, धारणी, वरूड, अंजनगाव सुर्जी, चांदूर बाजार या तालुक्यांमध्ये रविवारी दिवसभर पाऊस झाला, तर सायंकाळी अर्धा ते दीड तासांपर्यंत टपोऱ्या थेंबांनी झोडपून काढले. या पावसामुळे खरीप हंगाम हातचा जाणार का, अशी चिंता शेतकऱ्यांमध्ये दाटली आहे.  

बाजार समितीत गहू, सोयाबीन भिजलेअमरावती कृषिउत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल दुपारी ३ वाजेपर्यंत व्यापाऱ्यांनी खरेदी केला. व्यापाऱ्यांनी तो गोदामात नेण्यास उशीर केल्याने रात्रीच्या पावसाने सोयाबीन आणि गहू काही प्रमाणात भिजला. बाजार समिती रविवारी बंद राहत असल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी शनिवारी शेतमाल विक्रीला आणला नाही.

 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती