शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ह्दयद्रावक! यात्रेत फुगे विकणाऱ्याच्या गॅस सिलेंडरचा स्फोट; २ वर्षाची चिमुकली ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 22:27 IST

शिंदी बुद्रुक गावात गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर काही काळ यात्रेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती काहींनी यात्रा सोडून आपल्या घरची वाट पकडली तर घटनेची माहिती मिळताच पथ्रोट पोलीस घटनास्थळी दाखल झालेत.

परतवाडा (अमरावती) : अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक येथील पोळ्याच्या यात्रेत गॅसचे फुगे विकणाऱ्याकडील गॅस सिलेंडरचा शनिवार स्फोट झाल्यामुळे दोन वर्षीय बालिकेचा एक पाय शरीरापासून वेगळा झाला. ती घटनास्थळीच बेशुद्ध पडली. बेशुद्ध अवस्थेतच तिला उपचारार्थ दवाखान्यात दाखल केल्या गेले. मात्र या दरम्यान तिची प्राणज्योत मालवली.

भार्गवी उर्फ परी सागर रोही वय दोन वर्ष ही  रवींद्र किसनराव रोही वय 65 वर्ष या आपल्या आजोबांसोबत सायंकाळी गावातीलच यात्रेत गेली होती. उडणारा फुगा बघून ती आपल्या आजोबांसोबत त्या फुगे विक्रेत्याजवळ पोहोचली. त्याच दरम्यान फुगे विक्रेत्या जवळील गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. आणि यात भार्गवी गंभीर जखमी झाली. तिला उपचारार्थ दवाखान्यात पोहोचवण्याचा प्रयत्न केल्या गेला. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात तिला दाखल केल्या गेले. पण दवाखान्यात येण्यापूर्वीच तिची प्राणज्योत मालवली असल्याचे उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेंद्र ढोले यांनी लोकमतला सांगितले.

गॅस सिलेंडरच्या स्फोटानंतर काही काळ यात्रेत गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती काहींनी यात्रा सोडून आपल्या घरची वाट पकडली तर घटनेची माहिती मिळताच पथ्रोट पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. घटनेत दोन वर्षीय चिमुकली ठार झाल्याचे समजताच ठाणेदार सचिन जाधव यांनी अचलपूर येथील उपजिल्हा रुग्णालय गाठले. स्फोटाने यात्रेत खळबळ उडाली नागरिक सैरावैरा पळू लागले. नजीकच्या एका घराच्या स्लॅबला या स्फोटाने तडे गेल्याची माहिती डॉ जितेंद्र मसने व स्थानिकांनी लोकमतशी बोलताना दिली. निष्काळजीपणाने फुगे भरणारा सिलेंडर वापरल्याने संबंधित विक्रेताविरुद्ध पोलीस प्रशासनाची वृत्त लिहितोवर कारवाई सुरू होती

शिंदी बुद्रुक येथे तान्हा पोळा यात्रा असते फुगे भरण्यासाठी वापरण्यात येणारा गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन दोन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. पुढील तपास सुरू आहे. - सचिन जाधव, ठाणेदार, पथ्रोट