रक्तदान, २००० झाडांचे वृक्षारोपण
चांदूर बाजार : तालुक्यातील बेलोरा येथे राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून ग्रामपंचायत प्रशासनातर्फे कोरोनाकाळात जीव धोक्यात टाकून सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेवकांचा सत्कार करण्यात आला. ४४ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यांसह गावात २ हजार झाडांचे वृक्षरोपण करण्यात आले.
सरपंच दीपाली अरुण गोंडीकर, उपसरपंच सुप्रिया गिरीश उतखेडे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाने गावात जागोजागी शेकडो झाडांचे वृक्षारोपण केले. राज्यमंत्री बच्चू कडू यांनी वाढदिवसानिमित्त कोणताही खर्च न करता सर्वांनी मिळून ५१ हजार झाडांचे वृक्षारोपण करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार बेलोरा ग्रामपंचायत प्रशासन तसेच गावकऱ्यांनी मिळून परिसरात दोन हजार झाडांचे वृक्षारोपण केले.
लोकमत वृत्तपत्र समूह व बेलोरा ग्रामपंचायतीतर्फे ग्रामपंचायत सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या ४४ रक्तदात्यांनी रक्तदान करून सहभाग दर्शविला. यावेळी तुषार ऊर्फ बबलू देशमुख, अरुण गोंडीकर, बंटी उतखेडे, ग्रामपंचायत सदस्य सचिन पावडे, मंगेश ठाकरे, सुरेंद्र विधाते, संजय निमकर, महेंद्र रौंदळे, शरद पावडे, सुचिता राऊत, सविता घरडे, शारदा खवले, हमीदा परवीन मुस्ताक, सविता वानखडे, प्रियंका राऊत, गौरव झगडे, श्याम कडू, अभि कडू सह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.