शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

पीपीई किटला वैतागले आरोग्य कर्मचारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:14 IST

अमरावती : कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पीपीई किटने उन्हाळ्यात वैताग आणला ...

अमरावती : कोरोनापासून बचाव व्हावा, यासाठी कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या पीपीई किटने उन्हाळ्यात वैताग आणला आहे. कोरोनाने नाही तर या कीटमुळे मरू, असा या आरोग्य कर्मचाऱ्यांचा सूर आहे. सहा तासांच्या कर्तव्यात त्वचेला त्रास होतो, तर घामाने जीव नकोसा होत असल्याचे या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या जवळपास ४५ रुग्णालयांत कोरोनापासून बचाव करण्यासाठी पीपीई कीटचा (पर्सनल प्रोटेक्टिव्ह ईक्विपमेंट)वापर केला जातो. कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात या कीट दर्जेदार होत्या. नंतर मात्र, याचा दर्जा सुमार होत गेला. राज्यस्तरावर सर्व कीट पुरविल्या जातात. या किटमुळे पाच मिनिटांत व्यक्ती घामाघूम होत असल्याचे आरोग्य यंत्रणेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले.

सहा तास अंगावर किट असल्याने हवा लागत नाही. सर्व घाम पायाच्या बुटात जमा होतो. या सर्व प्रकारामुळे आरोग्य कर्मचारी कंटाळले आहेत. काहीजणतर रिक्स घेऊन कीटचा वापर करणे सोडले आहे. चेहऱ्याला मास्क अन् हातात ग्लोव्हज घालूू आरोग्य सेवा देत आहे. मात्र, काही रुग्णालयात कीट ही घालावीच लागत आहे.

कोट

कोरोना केअर सेंटरमध्ये पुरेशी खेळती हवा नाही. त्यात पीपीई कीट सहा तास घालणे यामुळे आता वैताग आलेला आहे. दर १० मिनिटांनी ही कीट काढाविशी वाटते. सध्या तरी काहीच उपचार नाही.

- एक आरोग्य कर्मचारी

कोट

आता उन्हाळा सुरू झालेला आहे. तापमान ४० अंशांवर गेले असताना पीपीई कीट सहा तास अंगावर घालणे, यामुळे आता वैताग आला आहे. कोरोनाने नाही तर या कीट घातल्याने मरण येईल, असे वाटते.

- एक आरोग्य कर्मचारी

कोट

सहा तास अंगावर कीट घालून राहणे हे एक दिव्यच आहे. अंगावर घाम येतो. त्यामुळे शरीराला खाज सुटते. अशावेळी कीट काढून टाकाविशी वाटते. परंतु दुसरा पर्यायदेखील नाही. आता या प्रकाराला कंटाळलो आहे.

- एक आरोग्य कर्मचारी

पाईंटर

शासकीय रुग्णालयात रोज किटचा वापर :३५०

पाईंटर

एकूण कोरोनाबाधित :४८,६३५

ॲक्टिव्ह रुग्ण : ३,४२५

आतापर्यंत संक्रमणमुक्त : ४४,५३६

एकूण मृत्यू : ६७४

कोट

राज्यस्तरावरून या पीपीई किटचा पुरवठा होतो, रोज ३२५ पर्यंत कीट लागतात. सहा तास अंगात घालून काम करावी लागतात. मागच्या उन्हाळ्यात देखील सर्वांनी कीट घालून काम केलेले आहे. यंदाही तीच परिस्थिती आहे.