रुग्णांचे हाल : युवा सेना आंदोलन छेडणारनांदगाव खंडेश्वर : शहरातील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांमुळे आरोग्यसेवा कोलमडली असून स्वच्छतेच्या अभावाने सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रुग्णांचे पुरेशा सुविधेअभावी प्रचंड हाल होत असल्याने तात्काळ कर्मचारी नियुक्त करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश मारोटकर यांनी जिल्हाधिकारी व शल्य चिकित्सकांना निवेदनाद्वारे दिल्या आहे.सध्या साथीचे आजार बळकावत आहे. दैनंदिन ग्रामीण रुग्णालयात ३०० ते ३५० रुग्ण उपचारासाठी येत असून एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याला मोठ्या प्रमाणात रुग्णांची तपासणी करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांना पुरेशी वैद्यकीय सेवा मिळत नाही. ग्रामीण रुग्णालयात अनेक महिन्यांपासून दोन वैद्यकीय अधिकारी, एक वैद्यकीय अधीक्षक, एक सहायक अधीक्षक, कनिष्ठ लिपिक या जागा रिक्त आहे. रुग्णांवर वेळेवर उपचार होत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी शिल्पा डोंगरे रुग्णसेवा देत आहे. परंतु एकाच वैद्यकीय अधिकाऱ्यावर संपूर्ण रुग्णसेवेचा ताण असल्याने यंत्रणा अपुरी पडत आहे. सफाई कर्मचारी रुग्णालयातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष करीत असल्याने अस्वच्छतेने कळस गाठला आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर फिल्टरची सोय नाही, शवविच्छेदन करणार स्लिपर नाही, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. रुग्णांवर उपचार करणारे तांत्रिक यंत्र बंद अवस्थेत आहे. या समस्या तातडीने निवाराव्यात, अशी मागणी आहे.
आरोग्य यंत्रणा ‘सलाईनवर’
By admin | Updated: August 9, 2016 00:08 IST