शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सुपर स्पेशालिटीसाठी आरोग्य मंत्र्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 00:30 IST

येथील विभागीय संदर्भ सेवा रूग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) टप्पा क्रमांक २ च्या पुर्णत्वासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. सुपर स्पेशालिटीच्या कामात निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

ठळक मुद्देसुनील देशमुख यांचा पुढाकार : अमरावती विभागासाठी ठरेल संजीवनी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: येथील विभागीय संदर्भ सेवा रूग्णालय (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) टप्पा क्रमांक २ च्या पुर्णत्वासाठी राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी मंगळवारी आढावा बैठक घेतली. सुपर स्पेशालिटीच्या कामात निधीची कमतरता पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.नागपूर येथे राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवार ११ डिसेंबरपासून प्रारंभ झाले आहे. अधिवेशनासाठी आलेल्या ना. दीपक सावंत यांनी मंगळवारी आरोग्यसेवेचा आढावा घेतला असता त्यांनी अमरावती जिल्ह्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणावर भर दिला. यावेळी आ. सुनील देशमुख यांनी अमरावती विभागातील पाचही जिल्हयातील रुग्णांकरिता आरोग्य सेवेत संजीवनी ठरावा, असे सुपर स्पेशालीटी हॉस्पीटल असल्याचा मुद्दा उपस्थित केला. आतापर्यंत येथे मुत्रपिंडाशी संबंधित विकार, बालकांच्या शस्त्रक्रिया, प्लास्टिक सर्जरी आदी मोफत करण्यात आल्या आहेत. याच शृंखलेत या रुग्णालयाच्या विस्तारीत टप्पा- २ ची मुहुर्तमेढ रोवण्यात आली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने हदयविकार, मेंदूविकार व कर्करोग या आजारांवर उपचाराची सोय होणार आहे. इमारत पूर्णत: निर्माण झााली असून उर्वरित काम पूर्ण करुन लवकरच कार्यान्वित करण्यासाठी निधीची आवश्यकता असल्याची बाब आ. सुनील देशमुख यांनी मांडली.याबैठकीत प्रामुख्याने विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय टप्पा-२ चे मॉडयुलर शल्यगृह, मॉडयुलर फर्निचर, वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा, सुपर स्पेशलिटी, डफरीन व प्रस्तावित जिल्हा स्त्री रुग्णालयाचे एकत्रित मलनि:स्सारण प्रक्रिया प्रकल्पाचे बांधकाम याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मॉडयुलर शल्यगृह व मॉडयुलर फर्निचर मंजुरीचे शासन निर्णय निर्गमित झााले असून त्याच्याकरिता निधी उपलब्ध करुन देण्याचे मान्य करण्यात आले. वैद्यकीय उपकरणांचा खरेदीची प्रक्रिया शासनस्तरावर केंद्रकृत पध्दतीने करुन ते उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले. त्याचप्रमाणे मलनि:स्सारण प्रक्रिया प्रकल्प कार्यान्विीत केल्याशिवाय प्रदुषण नियंत्रण मंडळाचे ना-हरकरत प्रमाणपत्र प्राप्त होणार नसल्याची बाब आ. सुनील देशमुख यांनी निदर्शनास आणून दिली.

टॅग्स :Sunil Deshmukhसुनिल देशमुख