शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांद्वारे आरोग्य विभागाची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2019 06:01 IST

शहरी आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत ए.एन.एम. यांच्या गृहभेटी वाढवून यादरम्यान नागरिकांना स्वाइन फ्लू व डेंग्यू या आजाराची लक्षणे व घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देण्याबाबत निर्देश आयुक्तांनी दिले. तक्रार आल्यास त्या ठिकाणी त्वरित साफसफाई, फवारणी व धूरळणी करावी आणि ज्या ठिकाणी लार्व्हा आढळत आहेत, अशा ठिकाणी पाणी काढून टाकण्याच्या सूचना संबंधितांना कराव्या, असे आयुक्त म्हणाले.

ठळक मुद्देसाथरोग नियंत्रण बैठक : नियमित फवारणी, धूरळणी करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरात स्वाइन फ्लू, डेंग्यू व साथरोगाला प्रतिबंध, उपचार व उपाययोजना यासंदर्भात सोमवारच्या बैठकीत महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागासह नगररचना विभागाच्या अधिकाऱ्यांची चांंगलीच झाडाझडती घेतली. ज्या परिसरामध्ये संशयित व निश्चित निदान झालेले डेंग्यूरुग्ण आढळून येत आहेत, त्या परिसरामध्ये त्वरित फवारणी व धूरळणी करण्याचे तसेच डासांची अळी प्रतिबंधक औषध मारण्याचे निर्देश आयुक्त संजय निपाणे यांनी दिले.शहरी आरोग्य केंद्रांतर्गत कार्यरत ए.एन.एम. यांच्या गृहभेटी वाढवून यादरम्यान नागरिकांना स्वाइन फ्लू व डेंग्यू या आजाराची लक्षणे व घ्यावयाच्या दक्षतेबाबत माहिती देण्याबाबत निर्देश आयुक्तांनी दिले. तक्रार आल्यास त्या ठिकाणी त्वरित साफसफाई, फवारणी व धूरळणी करावी आणि ज्या ठिकाणी लार्व्हा आढळत आहेत, अशा ठिकाणी पाणी काढून टाकण्याच्या सूचना संबंधितांना कराव्या, असे आयुक्त म्हणाले. नव्याने निर्माण होत असलेल्या संकुलांमधील साचलेले पाणी त्वरित बाहेर काढावे व त्याबाबत स्पष्ट सूचना व नोटीस संबंधित इमारतमालकाला देण्याचे निर्देश आयुक्तांनी सहायक संचालक नगररचना विभागाला दिले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी, हिवताप अधिकारी डॉ. संदीप बाबर, सहायक संचालक नगर रचना आशिष उईके, सहाय्यक आयुक्त (मुख्यालय) योगेश पिठे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे, डॉ. सीमा नैताम, डॉ. विक्रांत राजूरकर, आरोग्य अधीक्षक अरुण तिजारे, मनपातील डॉक्टर, जेष्ठ स्वास्थ्य निरीक्षक उपस्थित होते.कंटेनर त्वरित रिकामे कराडेंग्यूला आळा घालण्याच्या दृष्टिकोनातून शहरी आरोग्य केंद्रामार्फत ज्या विभागात तापाचे रुग्ण जास्त प्रमाणात आढळून येत आहेत, त्या विभागात जलद ताप सर्वेक्षण, पाणीसाठ्याची (कंटेनरची) तपासणी, दूषित आढळून आलेले कंटेनर त्वरित रिकामे करून घेणे, तापाच्या रुग्णांचे रक्तनमुने घेऊन ते तपासणीकरिता पाठविणे, जीवशास्त्रीय कार्यक्रमांतर्गत गप्पी मासे सोडण्याची कार्यवाही नियमितपणे करण्याच्या सूचना आयुक्तांनी केल्या. शाळा, महाविद्यालये, विविध परिसरांमध्ये गटसभा आयोजित करून नागरिकांना स्वाइन फ्लू व डेंग्यूबाबत जनजागृती करावी, असे आयुक्त म्हणाले.

टॅग्स :Healthआरोग्य