शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांनी घेतली आरोग्य विभागाची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 01:33 IST

शहरामध्ये कीटकजन्य आजारांचा प्रसार होऊ नये, यासाठी आयोजित आढावा बैठकीत महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली. पावसाळ्यापूर्वी व सध्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना मोठे नाले व नाल्यांच्या सफाईकामांविषयी अधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले.

ठळक मुद्देविविध विभागांची आढावा बैठक : जिल्हा शल्यचिकित्सकांच्याही सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरामध्ये कीटकजन्य आजारांचा प्रसार होऊ नये, यासाठी आयोजित आढावा बैठकीत महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली. पावसाळ्यापूर्वी व सध्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना मोठे नाले व नाल्यांच्या सफाईकामांविषयी अधिकाऱ्यांना त्यांनी खडे बोल सुनावले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये झालेल्या बैठकीला सहायक आयुक्त (मुख्यालय), जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा हिवताप अधिकारी तसेच महापालिकेचे सर्व वैद्यकीय अधिकारी, आशा वर्कर आदी उपस्थित होते. बांधकाम विभागाने शहरात मालवीय चौकात तसेच नमुना परिसराजवळ अंबानाला सफाईची कार्यवाही केली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत १८ मोठे व १९ लहान नाले साफ करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.अतिवृष्टीमध्ये वाहून येणारा गाळ व कचरा यामुळे नाले तुंबून आजूबाजूच्या परिसरात पाणी शिरते. हे नुकसान टाळण्यासाठी तुंबलेले नाले-नाल्या त्वरित मोकळे करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. ज्या ठिकाणी नाल्या तुटल्या किंवा सांडपाणी वाहून जाण्याकरिता नाल्या नाहीत, अशा ठिकाणी झोन स्तरावरील उपअभियंत्यांकडून सोकपीट तयार करण्यात येत आहे. पावसाळ्यात अतिवृष्टी कालावधीत नाल्याकाठच्या नागरिकांना सतर्क करण्यासाठी शहरात फिरणाऱ्या १३६ मिनीटिप्परवर असलेल्या ध्वनिक्षेपकाचा वापर करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच महापालिकेचे दवाखाने, अंगणवाडी केंद्रांवरही आरोग्यदायी सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना आयुक्तांनी यंत्रणेला दिल्या.नाल्यात कचरा न टाकण्याची ताकीदशहरातील सांडपाण्याच्या डबक्यांमधील पाण्याचा निचरा करुन घेण्यात आलेला आहे तसेच त्यामध्ये एम.एल.ओ. टाकण्यात आलेले आहे. वेळोवेळी पाण्याचा निचरा करण्याकरिता व तुंबलेल्या डबक्यांमध्ये एम.एल.ओ. टाकण्याकरिता स्पष्ट सूचना स्वास्थ्य निरीक्षकांना देण्यात आलेल्या आहेत. नाल्याकाठी असलेल्या नागरिकांना त्यांचा कचरा, प्लास्टिक, टाकाऊ वस्तू नाल्यांमध्ये न टाकण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या आहेत.शेणखत विल्हेवाटीसाठी पशुपालकांना नोटीसप्रभागातील पशुमालकांना त्यांच्याकडील शेणखताची त्वरित विल्हेवाट लावण्याकरिता नोटीस देण्याचे निर्देश आयुक्तांनी स्वास्थ्य निरीक्षकांना दिले. पावसाळ्यात सर्व प्रभागांतील तक्रार निवारण केंद्र सुरू ठेवण्याबाबत तसेच त्यामध्ये आवश्यक मनुष्यबळाची व्यवस्था करण्याबाबत कंत्राटदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील प्रत्येक प्रभागात पाच स्प्रे पंप व पाच फॉगिंग मशीन कार्यान्वित असल्याची माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Healthआरोग्य