शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

उष्माघातासाठी आरोग्य विभाग दक्ष; पीएचसी ५९ कक्ष सज्ज

By जितेंद्र दखने | Updated: March 26, 2024 21:37 IST

आरोग्य यंत्रणा अलर्ट : ग्रामीण, उपजिल्हा रुग्णालयात उपाययोजना

अमरावती : जिल्ह्यातील वाढता उकाडा आणि त्यातच संभाव्य उष्माघाताचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. खबरदारी म्हणून जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष स्थापन केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ५९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि नऊ ग्रामीण रुग्णालये, पाच उपजिल्हा रुग्णालये, मनपा क्षेत्रात १३ आणि जिल्हा सामान्य रुग्णालय असे एकूण ८७ कक्ष स्थापन केले आहेत.

या वातानुकूलित कक्षामध्ये पाणी, प्राथमिक किट, थंडावा निर्माण करणाऱ्या व्यवस्थेचा यात समावेश आहे. केंद्र सरकारने याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ज्यामध्ये प्रत्येक तालुक्याने, प्राथमिक आरोग्य केंद्राने या मार्गदर्शक सूचनांनुसार आपला उष्णता कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच उष्माघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे डेथ ऑडिट जिल्हास्तरीय डेथ ऑडिट कमिटीमार्फत नियमित करण्यात यावे. कोणत्याही मृत्यूचे डेथ ऑडिट एक आठवड्याच्या आत करावे, अशाही सूचना आहेत. त्यानुसार आरोग्य विभागाने उष्माघात कक्ष कार्यान्वित केलेले आहेत.

हीट वेव्ह म्हणजे काय?हीट वेव्ह किंवा उष्णतेची लाट ही एक मूक आपत्ती (सायलेंट डिझास्टर) आहे. सर्वसाधारणपणे एखाद्या प्रदेशात सलग तीन दिवस नेहमीच्या कमाल तापमानापेक्षा वातावरणातील तापमान ३ अंश सेल्सिअसने जास्त असेल, तर त्याला उष्णतेची लाट असे संबोधतात किंवा सलग दोन दिवस एखाद्या भागात ४५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असेल, तर त्या भागात उष्णतेची लाट आली आहे, असे समजावे.

अशी घ्या काळजीपुरेसे पाणी प्या, प्रवासात पाणी सोबत ठेवा, हलक्या वजनाचे, फिकट रंगाचे, सैलसर कपडे वापरा. उन्हात गॉगल, छत्री, पादत्राणे वापरा. उन्हात जाताना टोपी, हॅटखाली ओलसर कपडा ठेवा, ओलसर पडदे, पंखा, कूलर यांच्या मदतीने घर थंड ठेवा.

ही घ्या खबरदारीशक्यतो उन्हाच्या वेळेत घराबाहेर जाणे टाळा, उन्हात कष्टाची कामे करू नका, पार्क केलेल्या वाहनात लहान मुलांना ठेवू नका, गडद रंगाचे, तंग कपडे वापरू नका, उन्हाच्या काळात स्वयंपाक करणे टाळा, स्वयंपाकघर हवेशीर ठेवा. मद्य, चहा, कॉफी, सॉफ्टड्रिंक्स टाळा. खूप प्रथिनेयुक्त अन्न आणि शिळे अन्न खाऊ नका.

सध्या वाढता उकाडा आणि त्यातच संभाव्य उष्माघाताचा धोका लक्षात घेता, आरोग्य विभागाने सर्व आरोग्य केंद्रांत उष्माघात कक्ष स्थापन केलेले आहेत. याबाबत आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश सर्व टीम एमओमार्फत पीएचसीच्या एमओंना दिले आहेत.- डॉ. सुरेश आसोल, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :AmravatiअमरावतीSun strokeउष्माघातhospitalहॉस्पिटल