धामणगाव रेल्वे : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत गव्हा निपाणी येथे शेतकऱ्यांना आरोग्यपत्रिकेचे धडे देण्यात आले. येथील देवकीनंदन मुंदडा यांच्या शेतात गहू पीक प्रक्षेत्रावर आयोजित कार्यक्रमात मोहिनी पुनसे यांनी माती परीक्षणाच्या आधारे पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन, जमिनीचे आरोग्य, जीवामृत दशपर्णी अर्क, कंपोस्ट, गांडूळ खत, शेण खत, मातीनमुना घेण्याची पद्धत सांगितली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी सागर इंगोले, मंडळ कृषी अधिकारी के. एम पाटील, कृषि पर्यवेक्षक एस. एम.बेंडे, कृषी सहायक कविता ठाकरे, जे. डी. गडमडे, ए.बी. पाटणकर, पी. पी. पाटबाजे, एम. के. गोरटे, व्ही. ए. गेडाम, पी. जी. नवले, एन. बी. ठाकरे, पोलीस पाटील गणेश हटवार, प्रगतीशील शेतकरी गजानन पाटील उपस्थित होते.