उत्कृष्ट विद्यार्थी आणि सुजाण नागरिक घडविण्यासाठी अथक परिश्रम घेणाऱ्या महानगरातील मुख्याध्यापक-प्राचार्यांना शनिवारी सायंकाळी ५ वाजता 'रंगोली पर्ल'मध्ये आयोजित एका शानदार सोहळ्यात मानाचा मुजरा करण्यात आला. लोकमत सखी मंच व लोकमत बालविकास मंचच्या वतीने आयोजित या कृतज्ञता सोहळ्याला आशा मानेकर, मोहन राठी, हरीश मेंढे, कांचन पाठक, व्ही. एस. वाघमारे, सरिता ढोले, रत्नमाला वानखेडे, लीला झंवर, जयश्री आसलकर, संतोष यादव, सुधीर महाजन, रश्मी मोहिंदेकर, माधुरी मंगरुळकर, उज्ज्वला कुळकर्णी, सुषमा देशमुख, शैलेंद्र नायडू, वैशाली आवळे, प्रशांत धर्माधिकारी या प्राचार्यांना सन्मानित केले गेले. यावेळी लोकमतचे उपमहाव्यवस्थापक सुशांत दांडगे आणि संपादकीय प्रमुख गणेश देशमुख हे उपस्थित होते. (छाया- रोहित निकोरे)
मुख्याध्यापकांना मानाचा मुजरा :
By admin | Updated: July 12, 2015 00:33 IST