शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

‘तो’ नियोजित बालविवाह थांबविणार!

By admin | Updated: December 27, 2014 22:42 IST

तीन महिन्यांनंतर यशोदानगरात होणारा बालविवाह थांबविण्याचे प्रयत्न चाईल्ड लाईनकडून सुरु झाले असून ‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना समुदेशन करण्यात येईल. बालविवाहाची प्रथा गेल्या

वैभव बाबरेकर - अमरावतीतीन महिन्यांनंतर यशोदानगरात होणारा बालविवाह थांबविण्याचे प्रयत्न चाईल्ड लाईनकडून सुरु झाले असून ‘त्या’ अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांना समुदेशन करण्यात येईल. बालविवाहाची प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून बंद झाली असतानाही अमरावती शहरात छुप्या मार्गाने बालविवाह होत असल्याचे यावरून निदर्शनास येत आहे. हनुमान व्यायाम प्रसारक मंडळातील चाईल्ड लाइनच्यावतीने आयसीडीसी प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. बहुजन हिताय संस्था व आयसीडीसीच्या प्रकल्प अधिकारी वंदना चौधरी यांच्या संयुक्त विद्यमाने किशोरवयीन मुला-मुलींना लैंगिक शोषणावर अंगणवाडी सेविका मार्गदर्शन करतात. तसेच त्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य करीत आहेत. या प्रकल्पाद्वारे हा बालविवाह थांबविण्याची तयारी सुरू आहे. चाईल्ड लाईनच्या प्रयत्नाचे फलितत्याअनुषंगाने काही दिवसांपूर्वी अंगणवाडीसेविकांच्या माध्यमातून रमाबाई आंबेडकरनगर व फ्रेजरपुरा परिसरात किशोरवयीन मुलींना प्रशिक्षण देणे सुरु असताना यशोदानगरात एका १५ वर्षीय मुलीचा विवाह होत असल्याची माहिती चाईल्ड लाईनच्या मिळाली. हा विवाह तीन महिन्यानंतर होणार असल्यामुळे हा विवाह थांबविण्यासाठी प्रयत्न चाईल्ड लाइनचे समन्वयक प्रशांत गुलक्षे करीत आहेत.