शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नरखेडहून यायचा, वरूड तालुक्यात चोरी करून रफुचक्कर!

By प्रदीप भाकरे | Updated: October 21, 2023 16:42 IST

घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार जेरबंद : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती : नागपूर जिल्ह्यातील नरखेडमधून नजिकच्या वरूड तालुक्यातील गावे लक्ष्य करणाऱ्या एका २७ वर्षीय आंतरजिल्हा चोराला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. अमरावती ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने २० ऑक्टोबर रोजी त्याला वरूड ते धनोडी मार्गावरून अटक केली. महेश गजानन लोनारे (२७, रा जामगाव, ता. नरखेड जि. नागपूर) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सोन्याचे दागिणे, मोबाईल दुचाकी व रोख रक्कम असा एकूण १.४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शेंदुरजना घाट येथे मोहम्मद ईशाक यांच्या घरातून १८ ते १९ ऑक्टोबरदरम्यान सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ५७ हजार ५०० रुपयांचा माल चोरी गेला होता. त्यानुसार, शेंदुरजना घाट येथे गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्याचा समांतर तपास करताना २० ऑक्टोबर रोजी महेश लोनारे, नामक इसम हा सोन्या चांदीचे दागिने घेवुन विक्रीकरीता वरूड ते धनोडी रोडवरील साईकृपा हॉटेलजवळ विचारपुस करीत आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार एलसीबीने दुचाकीवरील महेश लोणारे यास ताब्यात घेऊन त्यास विचारपुस केली असता त्याने उड़वाउडवीचे उत्तर दिली.

चोरीच्या गुन्हयांची कबुली

चाैकशीदरम्यान शेंदुरजनाघाट येथील एका घरात आणि बालासुंदरी देविच्या मंदिरात चोरी केल्याची कबुली त्याने दिली. त्याच्या अटकेमुळे वरूडमधील तीन व शेंदुरजनाघाट येथे नोंद असलेल्या एक असे चार गुन्हे उघड झाले. चारही गुन्हे याच वर्षाचे आहेत. पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनात एलसीबीप्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात उपनिरिक्षक नितीन चुलपार, शेख तस्लीम, मुलचंद भांबुरकर, एएसाआय संतोष मुदाने, बळवंत दाभणे, रविद्र चावणे, भुषण पेठे, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, पंकज फाटे, हर्षद घुसे, मंगेश मानमोठे यांनी ही कारवाई केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटकAmravatiअमरावती