शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

तो म्हणाला ‘चुकले असेल तर माफ करा’

By admin | Updated: August 21, 2015 00:50 IST

तालुक्यातील आडनदी फाटा येथे मंगळवारी एका दरीत आई व मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या की आत्महत्या याचा खुलासा अजूनही झाला नसल्याने मृत्यूचे गूढ कायम आहे.

आजाराच्या नैराश्येतून मृत्यूचा कयास : मायलेकाच्या मृत्यूचे गुढ कायमनरेंद्र जावरे चिखलदरातालुक्यातील आडनदी फाटा येथे मंगळवारी एका दरीत आई व मुलाचा मृतदेह आढळून आला. त्यांची हत्या की आत्महत्या याचा खुलासा अजूनही झाला नसल्याने मृत्यूचे गूढ कायम आहे. दुसरीकडे मृत ऋषिराज नागले यांनी शेजाऱ्यांना ‘काही चुकले असेल तर माफ करा’ अशी माफी मागत घरुन गेल्यावर त्याचा मृतदेह आढळून आल्याचे तपासात उघड झाले आहे. मंगळवारी आडनदी फाटा येथे एका ५०९ फूट दरीत दोन मृतदेह कुजलेल्या व नग्न अवस्थेत आढळले. याची माहिती वन कर्मचाऱ्यांनी पोलिसात दिली. दोन्ही मृतदेहाबाबत तर्क वितर्क काढले. रात्री ८ वाजताच्या मृताच्या मुलीसह परिजनांनी अज्ञात मृतदेह ऋषीराज लालू नागले (५१) व त्याची आई सुमित्रा लालू नागले (७५) रा.कविठा ता.अचलपूर अशी त्यांची ओळख पटविली. अज्ञात मृतदेह असल्याने पर्यटक की स्थानीय रहिवाशी, अशी माहिती पुढे येत होती. मृतदेह कुजल्याने घटनास्थळी दोन्ही मृतदेह नग्न व साडी नसलेल्या अवस्थेत सापडल्याने हत्या की आत्महत्या या बाबत संभ्रम अजूनही कायम आहे. दोन्ही मृतदेहाचा व्हिसेरा प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल आल्यावर पोलिसांना हत्या की आत्महत्या हे स्पष्ट करण्यास मदत होणार आहे. दोघांना आजाराने ग्रासलेमृत ऋषिराज लालू नागले हा 'अ‍ॅपेंडीक्स' च्या आजारामुळे त्रस्त होता. त्यांची आई म्हातारी झाल्याने तिला प्रात:विधीचा सततचा त्रास होता. १४ आॅगस्ट रोजी दोघेही घरुन जाताना दवाखाण्यात उपचारासाठी जात असल्याचे पत्नी मुन्नी व मुलांना सांगितले. मात्र, त्यानंतर दोघेही परतलेच नाही. आजाराने दोघेही ग्रस्त असल्याची माहिती पोलिसांना दिली. या आजाराने ग्रस्त झाल्यामुळे जीवन यात्रा संपविली का, याचा तपास पोलीस करीत आहे.चुकले असेल तर माफ कराऋषिराज नागले यांच्या शेजारी राहणाऱ्या काळे नामक इसमाची भेट घेतली व ‘आपले काही चुकले असेल तर माफ करा’ असे शब्द उच्चारले, दोघांचे काही संभाषण झाले. शेजाऱ्यांना अचानक माफी मागत ऋषिराज नागले आई सुमित्राला घेऊन निघून गेले. त्यानंतर ते परतलेच नसल्याची पोलीस तपासात पुढे आले आहे. ‘माफी मागताना ऋषिराज नागले यांचे डोळे पानावले व अश्रुसुध्दा बाहेर पडले.आॅटोने गेले आडनदीपर्यंतदवाखान्यात जाण्यास निघालेल्या नागले मायलेकांनी परतवाडा येथून एक आॅटो केला व आडनदीपर्यंत गेले. सुधीर नामक रिक्षाचालकाने स्वत: पुढे येऊन ही माहिती पोलिसांना दिली आहे.दोघांचा मृत्यू नेमका कशाने झाला यासाठी व्हिसेरा पाठविण्यात आला आहे. सर्व पध्दतीने बारीक-सारीक माहिती गोळा करण्यात येत असून मृत्यूचे कारण शोधले जात आहे.- नितीन गवारे, ठाणेदार चिखलदरा.