शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

‘तो’ विष घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2019 23:58 IST

अटकेच्या भीतीने रेकॉर्डवरील अट्टल चोराने विषाचे घोट घेतच पोलीस ठाणे गाठल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास येथे घडली. येवदा ठाण्यात घडलेल्या या अनपेक्षित घटनेने पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. त्या कुख्यात आरोपीला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

ठळक मुद्देअट्टल चोराचा प्रताप : येवदा पोलिसात खळबळ

येवदा : अटकेच्या भीतीने रेकॉर्डवरील अट्टल चोराने विषाचे घोट घेतच पोलीस ठाणे गाठल्याची खळबळजनक घटना मंगळवारी सकाळच्या सुमारास येथे घडली. येवदा ठाण्यात घडलेल्या या अनपेक्षित घटनेने पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. त्या कुख्यात आरोपीला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.श्रावण प्रल्हाद रायबोले (३६, रा. लेंडीपुरा, येवदा) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पोलीस सूत्रानुसार, श्रावण प्रल्हाद रायबोले हा अट्टल चोर व खिसेकापू आहे. त्याच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल आहेत. पैकी काही गुन्ह्यांच्या चौकशीसंदर्भात त्याला दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. तो मंगळवारी सकाळच्या सुमारास पोलीस ठाण्यात हजर झाला. तेथे पोहोचताच त्याने आपण विषारी औषध प्राशन केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनीही तसे निरीक्षण नोंदविले. भंबेरी उडालेल्या पोलिसांनी प्रथम स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात, नंतर दर्यापूर उपजिल्हा रुग्णालयात व पुढे अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असून, त्याने केवळ भीतीपोटी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे स्थानिक पोलिसांनी सांगितले. आरोपीचे वडील प्रल्हाद भिकाजी रायबोले व भाऊ विकास प्रल्हाद रायबोले यांच्याविरुद्धही घरफोडी व खिसे कापून चोरी केल्याचे अनेक गुन्हे दाखल असून, ते सर्व गुन्हेगारी प्रवृत्तीचे असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.अमरावती येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात पोलिसांनी त्याचे बयान घेतले असता, पोलिसांकडून अटक होण्याच्या भीतीपोटी आपण विषारी औषध प्राशन करीत पोलीस ठाणे गाठल्याचे त्याने सांगितले.आरोपी श्रावण प्रल्हाद रायबोले याला दोन दिवसांआधी काही गुन्ह्यांच्या चौकशीबाबत बोलावले होते. मंगळवारी तो विषारी औषध घेऊन पोलीस ठाण्यात आला. त्याची अवस्था बघून आधी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. तो कुख्यात आरोपी आहे.- तपन कोल्हे ठाणेदार,येवदा