शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'त्याने' कांदा कापून केले बर्थ डे सेलिब्रेशन; अमरावती जिल्ह्यातल्या मोझरी येथील युवकाची शक्कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2020 14:08 IST

कोरोनाने तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ती व्यथा शासनापर्यंत पोहचविण्यासाठी मोझरी येथे केकऐवजी कांदा कापण्यात आला. हे अनोखे बर्थ डे सेलिब्रेशन समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जन्माचा असो वा विवाहाचा वाढदिवस, केकला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. मात्र सतत अस्मानी संकटाशी चार हात करणाऱ्या शेतकऱ्यांकडे कुठून येणार केक? कोरोनाने तर शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. ती व्यथा शासनापर्यंत पोहचविण्यासाठी मोझरी येथे केकऐवजी कांदा कापण्यात आला. हे अनोखे बर्थ डे सेलिब्रेशन समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे.मोझरी येथील एका कास्तकाराच्या मुलाने कांदा नासाडीकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी चक्क आपला पंचविसावा वाढदिवस केकच्या जागी कांदा कापून साजरा केला.कांदा पीक ऐन काढणीच्या वेळी अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडले. कांदा सडायला लागला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये किलो भाव असलेला कांदा आज सात ते दहा रुपये प्रतिकिलो दराने विकण्याची वेळ कास्तकारांवर आली आहे. परिणामी खिशात येणाऱ्या उत्पन्नात मोठी घट झाली. त्यामुळे कास्तकार चिंतेत आहे. त्या अनुषंगाने उजव्या हाताने अपंगत्व असलेला तुषार गवळी याने आपला वाढदिवस चक्क केकच्या जागी कांदा कापून साजरा केला. दिवस कोणताही असो, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू तरळत आहेत. त्यांच्या समस्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे तो म्हणाला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस