शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
4
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
6
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
7
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
8
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
9
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
10
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
11
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
12
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
13
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
14
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
15
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
16
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
17
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
18
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
19
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर

मुंबईहून परतलेला ‘तो’ कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 05:01 IST

३० वर्षीय युवक ज्या खोलीत क्वारंटाईन होता, तेथील अन्य एकाला अमरावतीला, तर दुसऱ्या खोलीतील सात लोकांना परतवाडा येथील डेडिकेटेड कोविड रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोना संक्रमित युवक व दर्यापूर तालुक्यातील शिवर या गावातील आठ जण एका वाहनाने मुंबईहून परतले होते. मात्र, युवकासह क्वारंटाइन सेंटरवरील कुणाचाही गावाशी संपर्क आलेला नाही.

ठळक मुद्देकाकडा सील : दर्यापूरला अलर्ट, क्वारंटाइन व्यक्तींना रुग्णालयात हलविले

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर तालुक्यातील काकडा येथील एका ३० वर्षीय रुग्णाचा थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा युवक मुंबईहून २१ मे रोजी काकड्यात दाखल झाला होता. गावातील ग्रामपंचायतलगत असलेल्या जनाबाई नाथे विद्यालयात तो क्वारंटाइन होता. २५,२६ व २७ मे रोजी त्याला तापासह अन्य त्रास जाणवू लागला. २९ मे रोजी अमरावतीच्या कोविड रुग्णालयात त्याला हलविले गेले. तेथे त्याचा थ्रोट स्वॅब घेतला गेला. तो अहवाल सोमवारी सकाळी पॉझिटिव्ह आला.३० वर्षीय युवक ज्या खोलीत क्वारंटाईन होता, तेथील अन्य एकाला अमरावतीला, तर दुसऱ्या खोलीतील सात लोकांना परतवाडा येथील डेडिकेटेड कोविड रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कोरोना संक्रमित युवक व दर्यापूर तालुक्यातील शिवर या गावातील आठ जण एका वाहनाने मुंबईहून परतले होते. मात्र, युवकासह क्वारंटाइन सेंटरवरील कुणाचाही गावाशी संपर्क आलेला नाही. ते गावात फिरले नाहीत. तरीसुद्धा खबरदारीची उपाययोजना म्हणून गाव सील करण्यात आले आहे. क्वारंटाइन सेंटरच्या शालेय परिसरासह लगतचा परिसर कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आला आहे. क्वारंटाइन सेंटरसह गावात निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया राबविली जात आहे. औषधांची फवारणी होत आहे. क्वारंटाइन असणाऱ्यांची तपासणी आरोग्य पथकांकडून केली जात आहे. अचलपूरचे तहसीलदार मदन जाधव, गटविकास अधिकारी जयंत बाबरे, तालुका आरोग्य अधिकारी किरण शिंदे, पथ्रोटचे ठाणेदार चौधरी, नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामसेवक वैशाली कोठवालसह तालुका प्रशासन गावात दाखल झाले आहेत.युवकासमवेत दर्यापूर तालुक्यातील सहा युवक एका वाहनाने मुंबईहून आले आहेत. या सहा लोकांची माहिती दर्यापूर प्रशासनाला देण्यात आली आहे. मुंबईहून आल्यापासून तो युवक क्वारंटाइन असून, त्याचा गावाशी संपर्क आलेला नाही.- मदन जाधवतहसीलदार, अचलपूर

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या