शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

भंगार गाड्यांतही त्याने दिली एसटीची सुरक्षित सेवा

By admin | Updated: August 24, 2015 00:35 IST

एसटी गाड्यांमुळे प्रवासी समाधान नाहीत. अशा परिस्थितीत सतत ९ हजार १२५ दिवस कोणताही अपघात न घडू देता सुरक्षित सेवा देणे एसटीचालकाला सोपे नाही.

चांदूरबाजार : एसटी गाड्यांमुळे प्रवासी समाधान नाहीत. अशा परिस्थितीत सतत ९ हजार १२५ दिवस कोणताही अपघात न घडू देता सुरक्षित सेवा देणे एसटीचालकाला सोपे नाही. हे सध्या राज्यात एसटीच्या वाढत्या अपघाताच्या संख्येवरून दिसून येते. मात्र याला अपवाद ठरला तो चांदूरबाजार तालुक्यातील बेलोरा येथील रहिवासी एसटीचालक मो. शफी सौदागर.सन १९८९ मध्ये मो. शफी एसटीच्या सेवेत चालकपदी रुजू झाले. तेव्हापासून आजपर्यंत एकूण ९ हजार १२५ दिवस म्हणजेच सलग २५ वर्षे चालक म्हणून कार्यरत आहेत. या काळात त्यांच्या कडून एकही अपघात घडला नाही. इतकेच काय तर मार्गात येणाऱ्या प्राण्यांच्याही जीवाला त्यांचेकडून धोका झाला नसल्याचे ते सांगतात. एसटीच्या चालक पदावर उपजिविका भागविणारे मो. शफी यांचे समाज कार्यातही महत्त्वाचे योगदान आहे. त्यांनी २००७ मध्ये नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या तालुक्यातील ७५० नागरिकांना सुरक्षितस्थळी पोहोचविण्यासाठी कोणताही अतिरिक्त मोबदला न घेता दिलेल्या सेवेबद्दल शासनाच्यावतीने त्यांचा गौरव करण्यात आला. आगार व्यवस्थापक सूर्यकांत देशमुख यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वा.नि. मकेश्वर, श्रीधर फुके, रुखंडे, प्रभाकर वासनकर, कारस्कर, बनसोडसह सर्व कर्मचारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)