शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पानपिंपरीला येणार सुगीचे दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:09 IST

: मनोहर मुरकुटे फोटो पी १० अंजनगाव पान २ ची बॉटम अंजनगाव सुर्जी : अमरावती, अकोला, बुलडाणा या ...

:

मनोहर मुरकुटे

फोटो पी १० अंजनगाव

पान २ ची बॉटम

अंजनगाव सुर्जी : अमरावती, अकोला, बुलडाणा या जिल्ह्यांमध्ये सातपुड्याच्या पायथ्याशी सत्तर वर्षांपासून परंपरागत पद्धतीने पानपिंपरी या वनौषधी पिकाची लागवड ही फार मोठ्या प्रमाणात केली जाते. या पिकाला सध्या मिळत असलेल्या दरामुळे गेल्या सहा वर्षांपासून हे पीक मोडीत काढण्याची भूमिका घेतलेले शेतकरी आनंदित झाले आहेत. हा दर स्थिर राहिल्यास पानपिंपरी उत्पादकांच्या कष्टाचे चीज होईल, अशा प्रतिक्रिया अंजनगाव सुर्जी परिसरात उमटत आहेत.

आठ ते दहा वर्षांपासून पानपिंपरी पिकावर सतत निसर्गाचा कोप होत आहे. शासनाचे तुटपुंजे अनुदानही दोन वर्षांपासून बंद पडले. त्यामुळे ह्या भागातील शेतकऱ्यांवर उपासमारीची पाळी आली. अशाही परिस्थितीत महागडे खर्चाचे पानपिंपरी हे वनौषधी पीक जिवंत ठेवण्याचे काम परिसरातील शेतकरी हे अविरत करीत आहेत. पाच, सहा वर्षांपासून या पिकाला ३०० ते ३५० रुपये प्रतिकिलो दर मिळत होता. परंतु, उत्पादक कमी झाल्याने घटलेले पानपिंपरी उत्पादन व कोरोनाचा प्रभावामुळे पिकाला आयुर्वेदामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेली वाढती मागणी पाहता, यावर्षी ५५० रुपये प्रतिकिलोवर दर पोहोचला. काही दिवसांत हाच दर ६०० ते ७०० रुपये प्रतिकिलोवर जाण्याची चिन्हे दिसत असल्याचे व राष्ट्रीय स्तरावरून वाढती मागणी पाहता, दरात तेजी राहणार असल्याचे व्यापारी वर्ग व शेतकऱ्यांची चर्चा जोर धरत आहे.

बॉक्स

कोरोनावर गुणकारी औषध म्हणून पानपिंपरी उपयोगात आणले जात आहे. त्यामुळे पिकाच्या दरात तेजी राहणार, हे निश्चित आहे.

- संजय नाठे, पिपरी उत्पादक शेतकरी

बॉक्स

आंतरराष्ट्रीय बाजारात पिकाची मागणी वाढत आहे. त्यामुळे यावर्षी चांगला भाव मिळत आहे. तो यापुढेदेखील वाढता राहील.

- संजय टिपरे, व्यापारी

-------------

पानपिंपरी पिकाचा उत्पादन खर्च ३०० ते ४०० रुपये प्रतिकिलो या दरात निघत नव्हता. अन्य पर्याय उपलब्ध नसल्यामुळे याच पिकाच्या भरवशावर शेतकरी होते. आताचा दर भविष्यात कायम राहिल्यास उत्पादक शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यास मदत होईल.

- मनोहर मुरकुटे, शेतकरी