शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
6
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
7
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
8
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
9
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
10
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
12
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
13
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
14
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
15
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
16
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
17
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
18
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
19
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
20
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

बहिरम यात्रेत आज जागेचा हर्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 01:14 IST

विदर्भातील सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दरवर्षी १० ते ११ लाख रुपये महसूल मिळवून देणारी ही यात्रा जिल्हा परिषदेकरिता उत्पन्नाचे साधन बनली असली तरी नागरिकांकरिता मात्र जिल्हा परिषदेतर्फे कोणतीच सुविधा केली जात नाही.

ठळक मुद्देलाखोंचे उत्पन्न, सुविधा गायब : जिल्हा परिषदेकडून विकास शून्य

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : विदर्भातील सर्वाधिक काळ चालणारी बहिरम यात्रा २० डिसेंबरपासून सुरू होणार आहे. दरवर्षी १० ते ११ लाख रुपये महसूल मिळवून देणारी ही यात्रा जिल्हा परिषदेकरिता उत्पन्नाचे साधन बनली असली तरी नागरिकांकरिता मात्र जिल्हा परिषदेतर्फे कोणतीच सुविधा केली जात नाही. दरम्यान, ७ डिसेंबरला यात्रेतील जागांचा हर्रास होणार आहे.सातपुड्याच्या पायथ्याशी मध्य प्रदेश व महाराष्ट्राच्या सीमेवर ही यात्रा १२७ हेक्टर क्षेत्रात भरत असते. यामध्ये दरवर्षी ६५० ते ६७५ निरनिराळी दुकाने थाटली जातात. या दुकानदारांकडून दरवर्षी प्रशासनाला १० ते ११ लाख रुपये उत्पन्न होते, तर या यात्रेवर प्रशासनाकडून केवळ दोन ते तीन लाख रुपयेच खर्च केले जातात. या आलेल्या उत्पनामधून ५० टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडे जमा होते व उर्वरित ५० टक्के रक्कम कारंजा बहिरम ग्रामपंचायतीला जमा होतो. संपूर्ण यात्रेच्या देखरेखीची व सुविधा पुरविण्याची जबाबदारी चांदूर बाजार पंचायत समितीवर राहते. मात्र, यात्रेत सुविधा पुरविण्यावर आवश्यक खर्च केला जात नसल्याने यात्रेकरूंना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.जिल्ह्यातील सर्वात जास्त वेळ राहणारी आणि शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत विविध समुदायांचा मिलाप होत असतो. त्यांच्या सुविधेला प्राधान्य दिल्यास महसूल वाढीस लागेल. त्यामुळे सर्व स्तरांतील लोकप्रतिनिधींनी आपसी मतभेद विसरून जिल्ह्याचे वैभव असणाऱ्या बहिरम यात्रेच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अशी रास्त मागणी बहिरामबाबा भक्तांनी केली आहे.नवसाला पावणारा बहिरमबाबाबहिराम यात्रा सातपुड्याच्या पायथ्याशी भरत असल्याने या भागात राहणारे आदिवासी बांधवांचे यात्रेत मोठ्या प्रमाणात आवागमन सुरू असते. बहिरमबाबा हे अनेक कुटुंबांचे आराध्य दैवत असून, आपल्या कुलदैवताचे नवस फेडण्याकरिता हजारो भाविक यात्रेत दर्शनाला येतात. त्यामुळे नवसाला पावणारा बहिरमबाबा अशी या दैवताची ओळख आहे.रोजगाराचे साधनयात्रेतील दुकानांकरिता जागेचा लिलाव स्थानिक पंचायत समितीतर्फे ७ डिसेंबरला केला जाणार आहे. यात्रेत ग्रामीण भागातील कलाकुसरीचे साहित्य विक्रीकरिता येत असतात. त्यामुळे ही यात्रा अनेकांच्या रोजगाराचे साधन बनली आहे. दरवर्षी पंचायत समितीतर्फे या यात्रेतील दुकानांच्या जागेचा लिलाव घेण्याकरिता नागरिकांची गर्दी होते.या सुविधांची मागणीराहुट्या टाकून यात्रेत अनेक दिवस मुक्काम केला जात असल्याने आवश्यक सुविधांची मागणी होते. भाविकांसाठी आवश्यक त्या प्रमाणात स्वछतागृह नसून, महिला वर्गाला कुचंबणा सहन करावी लागते. यात्रेकरूंना आवश्यक प्रमाणात पिण्याच्या पाण्याची सोय या यात्रेदरम्यान दिसून येत नाही. 

टॅग्स :zpजिल्हा परिषद