शहरं
Join us  
Trending Stories
1
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
2
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
3
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
4
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
5
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
6
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे ट्रॅव्हल अम्मा?
7
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
8
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
9
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
10
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
11
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
12
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
13
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
14
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
15
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
16
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
17
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
18
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
19
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
20
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल

नुकसानग्रस्त शेतकरी वाऱ्यावरच

By admin | Updated: August 28, 2014 23:30 IST

२७ जुलै रोजी झालेल्या तालुक्यातील पूर्णा व चारघड नदीच्या महापुराने शेती व संत्राबागा उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे युद्धपातळीवर सर्वेक्षण झाले. मात्र, त्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई अद्यापही

सुरेश सवळे - चांदूरबाजार२७ जुलै रोजी झालेल्या तालुक्यातील पूर्णा व चारघड नदीच्या महापुराने शेती व संत्राबागा उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांचे युद्धपातळीवर सर्वेक्षण झाले. मात्र, त्यांना देण्यात येणारी नुकसान भरपाई अद्यापही त्यांच्या हातात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावे की मरावे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच एका नुकसानग्रस्त घाटलाडकीच्या गुलाम रसूल शेख नजीर या शेतकऱ्याने आपल्या संकटाची जाणीव एका निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांना केली असून जगावे की मरावे, या प्रश्नाचे उत्तर मागविले आहे. गुलाम रसूल यांचे शेत घाटलाडकी परिसरातील वारोळी शिवारात आहे. २७ जुलै रोजी चारघड धरण ओव्हरफ्लो झाल्याने नदीच्या महापुराने त्यांची शेती पूर्णपणे अस्तित्वहीन झाली आहे. या महापुरात त्यांचे शेतातील १० ते १७ वर्षांची ४५० संत्रा झाडे उद्ध्वस्त झालीत. त्यात त्यांच्या २ लाखांचा आंबिया बहराची फळे व मृगबहर नष्ट झाला. शेतातील कपाशी, तूर पिकाचे नुकसान झाले. बँकेचे कर्ज घेऊन सिंचनासाठी खरेदी केलेल्या ठिबक सिंचनाचे साहित्य, संत्रा झाडाच्या संरक्षणासाठी भाडेपट्ट्यावर आणलेले दोन हजार बासे या व्यतिरिक्त शेतीच्या जोडधंदा दोन म्हशी या चारगडच्या महापुरात वाहून गेल्या आहेत.बँकेचे कर्ज घेऊन उभारलेली खरिपाची पिके चारगडच्या नैसर्गिक संकटाने उद्ध्वस्थ झाल्यामुळे उपजिविकेचे साधनच नष्ट झाले. तालुक्यातील नुकसानीसह या महापुराने नुकसानग्रस्त शेतीचे सर्वेक्षण युद्धपातळीवर करून अहवाल १५ दिवसांपूर्वीच शासनाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र अद्यापही यावर शासनाने कोणताही निर्णय घेतलेला नसल्याने पूरग्रस्त शेतकरी संकटात सापडले आहेत. तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे