शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

विद्यापीठात ‘मार्इंड लॉजिक’ प्रबंधकाच्या कानशिलात हाणली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 22:04 IST

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची ‘एंड टू एंड’ कामांची जबाबदारी असलेल्या बंगळुरु येथील माइंड लॉजिक या एजंसीच्या प्रबंधकांच्या कानशिलात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी लगावली. हा प्रकार विद्यापीठात परीक्षा व मूल्यांकन विभागातील संचालकाच्या दालनात शुक्रवारी घडला. या घटनेमुळे विद्यापीठ वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देपरीक्षा नियंत्रकांच्या दालनातील प्रकार : युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांचा तोल सुटला

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षेची ‘एंड टू एंड’ कामांची जबाबदारी असलेल्या बंगळुरु येथील माइंड लॉजिक या एजंसीच्या प्रबंधकांच्या कानशिलात युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी लगावली. हा प्रकार विद्यापीठात परीक्षा व मूल्यांकन विभागातील संचालकाच्या दालनात शुक्रवारी घडला. या घटनेमुळे विद्यापीठ वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.आ. रवि राणा द्वारा स्थापित युवा स्वाभिमान संघटनेचे उपाध्यक्ष अभिजित देशमुख यांच्या नेतृत्वात काही विद्यार्थ्यांनी शुक्रवार, ५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक हेमंत देशमुख यांचे दालनात प्रवेश केला. मात्र, यावेळी दालनात हेमंत देशमुख नव्हते. अभिजित देशमुख यांनी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या आॅनलाइन निकालाची जबाबदारी असलेल्या माइंड लॉजिकचे प्रबंधक शैलेंद्र टंडन यांना बोलाविले. निकालात त्रुटी, विलंब आणि चुका होत असल्याबाबत त्यांना विचारणा केली. मात्र, माझे काम स्कॅनिंग करणे आहे. पुनर्मूल्यांकन करून विद्यार्थ्यांची यादी परीक्षा नियंत्रकांकडे सोपविल्याची माहिती टंडन यांनी दिली. कार्यकर्त्यांनी टंडन यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. तरीही ते काहीही बोलत नव्हते. अखेर युवा स्वाभिमानचे उपाध्यक्ष अभिजित देशमुख यांचा तोल सुटला आणि त्यांनी टंडन यांच्या कानशिलात जोरदार लगावली. त्यानंतर परीक्षा नियंत्रकाच्या दालनात एकच गोंधळ उडाला. यानंतर काहींनी टंडन यांना दालनाबाहेर नेले, हे विशेष.यापूर्वी युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी एमसीए निकालात चुका झाल्याबाबत २५ सप्टेंबर रोजी विद्यापीठात आंदोलन केले होते.अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या ८६० विद्यार्थ्यांचे निकाल अद्यापही अपूर्ण आहे. गुरुवारी उशिरापर्यंत या विद्यार्थ्यांची यादी दिली नाही. त्यामुळे शुक्रवारी पुन्हा विद्यापीठात गेलो. मात्र, परीक्षा व मूल्यांकन विभागाचे संचालक उपस्थित नव्हते. दरम्यान, माइंड लॉजिक एजन्सीच्या प्रबंधकांना याविषयी विचारणा केली असता, त्यांनी व्यवस्थित उत्तर दिले नाही.- अभिजित देशमुख, उपाध्यक्ष, युवा स्वाभिमानमी दालनात नसताना हा प्रकार घडला. माइंड लॉजिकच्या प्रबंधकांनी याबाबत रितसर तक्रार दिली आहे. हे प्रकरण पोलिसांत दिले जाईल. युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांची मागणी अवाजवी आहे. अभियांत्रिकी पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले असताना आता कॅरीआॅन देण्याची मागणी आहे. मात्र, ही मागणी तर्कसंगतच नाही.- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन विभाग.