शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

घरी रीघ शुभेच्छांची, खासदारांना चिंता दुष्काळाची!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 01:14 IST

नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या यशाचे शिल्पकार आमदार रवि राणा यांना शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ त्यांच्या घरी लागलेली असताना, दोघांनाही चिंता मात्र दुष्काळग्रस्त, आगग्रस्त, पाणी नि वैरण टंचाईग्रस्तांची लागली आहे.

ठळक मुद्देआता कामाची घाई : पाणी-वैरणटंचाईसंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

गणेश देशमुख ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नवनिर्वाचित खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या यशाचे शिल्पकार आमदार रवि राणा यांना शुभेच्छा देणाऱ्यांची रीघ त्यांच्या घरी लागलेली असताना, दोघांनाही चिंता मात्र दुष्काळग्रस्त, आगग्रस्त, पाणी नि वैरण टंचाईग्रस्तांची लागली आहे.गुरुवारी उशिरा रात्री विजयी घोषित झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी नवनिर्वाचित खासदारांनी दुष्काळाच्या मुद्यावर जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून निर्देशही दिलेत.निवडणुकीनंतर जिल्ह्यातील काही गावांमध्ये आग लागल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. हातावर आणून पानावर खाणाºयांना तर जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला.धारणी तालुक्यातील भुलोरी या गावात आगीने जे तांडव केले, ते 'पंचमहाभूतां'च्या शक्तीची जाणीव करून देणारे होते. आदिवासीबहुल भागातील सुमारे ५० घरे-गोठ्यांची अक्षरश: राख झाली. भुलोरीतील गावकरी मंगलकार्यासाठी नजीकच्या गावात गेले असताना, ती घटना घडल्यामुळे बचावाचीही संधी मिळू शकली नाही. गोठ्यात बांधलेली जनावरे जागीच कोळसा झाली.वलगावातील २१ घरेही अशीच आगीत बेचिराख झाली. लोक उघड्यावर आलेत. खासदार नवनीत राणा यांनी आगग्रस्तांच्या उपाययोजनांसंबंधाने प्रशासनाकडून माहिती घेतली. तेथील भेटीचेही नियोजन त्यांनी आखले आहे.नियोजनास आरंभऐतिहासिक विजय मिळवून सर्वाधिक कमी वयाच्या पहिल्या महिला खासदार असा बहुमान प्राप्त करून १२ तासही उलटले न उलटले तोच नवनीत रवि राणा यांनी जिल्हावासी होरपळत असलेल्या दुष्काळाच्या आणि पाणी-वैरणटंचाईच्या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले.शुभेच्छा देण्यासाठी घरापर्यंत येणाºयांना सामोरे जाणे हे कर्तव्य असल्याच्या भावनेतून राणा दाम्पत्याने शुक्रवारी दिवसभर शुभेच्छांचा स्वीकार केला. सकाळपासून सुरू झालेला लोकप्रवाह रात्रीपर्यंत ओसंडून वाहत होता. आनंदोत्सवात शुभेच्छांचा स्वीकार करणाºया या आमदार-खासदार जोडप्याच्या डोक्यात दुष्काळ निवारणाचाही मुद्दा फिरत होता. निकालाच्या रात्रीच उशिरा त्यासंबंधी त्यांनी नियोजन आखले.काय केले जावे, काय करणे शक्य आहे, यासाठी जिल्हाधिकारी शैलश नवाल यांच्याशी शुक्रवारी सकाळी दूरध्वनीहून चर्चा केली. सामान्यजनांना काय मदत करता येईल या अनुषंगाने सूचना केल्या, निर्देश दिले. याच मुद्यावर जिल्हाधिकारी कार्यालयात लवकरच बैठक घेण्याचीही सूचना खासदारांनी जिल्हाधिकारी नवाल यांना केली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील खासदारांसाठीचे शासकीय कार्यालय लगेच कार्यान्वित करण्याची सूचना खासदार नवनीत राणा यांनी जिल्हाधिकाºयांना शुक्रवारी सकाळी केली. प्रशासकीय स्तरावरून त्याची अंमलबजावणी केली गेली. खासदारांनी त्या कार्यालयाची जबाबदारीही त्यांच्या स्टाफला नेमून दिली. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालamravati-pcअमरावती