शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

जीएसटीत अडकली हनुमानजींची दिवाबत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 23:02 IST

अचलपूरमधील हनुमान मंदिराच्या दिवाबत्तीसह भोगराग नैवेद्यम सामग्रीकरिता राजस्थान सरकार अनुदान देत आले आहे. तथापि, मागील १४ महिन्यांचे हे अनुदान जीएसटीअभावी राजस्थान सरकारकडे अडकले आहे.

ठळक मुद्देसंडे अँकर । अचलपूरमधील हनुमानजीला राजस्थान सरकारचे अनुदान; राजा मानसिंह प्रथम यांच्या स्मृतींचे जतन

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूरमधील हनुमान मंदिराच्या दिवाबत्तीसह भोगराग नैवेद्यम सामग्रीकरिता राजस्थान सरकार अनुदान देत आले आहे. तथापि, मागील १४ महिन्यांचे हे अनुदान जीएसटीअभावी राजस्थान सरकारकडे अडकले आहे.राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातील ऋषभदेव येथील देवस्थान विभागाच्या सहायक आयुक्तांकडून हे अनुदान पाठविले जाते. अचलपूर शहरातील जयसिंगपुरा येथील हनुमानजी व महादेव मंदिराची (राजा की छत्री) राजस्थान सरकारकडे आहे. या मंदिरात दिवाबत्ती, भोगराग नैवेद्यम करण्याकरिता राजस्थान सरकारकडून पुजारी नियुक्त आहे. काही वर्षांपूर्वी लालबहादूरसिंह ठाकूर पुजारी होते. आता त्यांचा मुलगा सुरेशसिंह ठाकूर यांच्याकडे ही जबाबदारी राजस्थान सरकारने सोपविली आहे.पुजाऱ्याच्या दरमाह वेतनासह दिवाबत्ती आणि भोगराज नैवेद्यमकरिता स्वतंत्र अनुदान राजस्थान सरकारकडून आॅनलाइन बँक खात्यात जमा केले जाते. दरमहा १८०० रुपये वेतन आणि १५०० रुपये भोगराग नैवेद्यम सामग्रीचे बिल दरमहा नियुक्त पुजाºयाला देवस्थान विभागाच्या सहायक आयुक्तांकडे सादर करावे लागतात. दरम्यान, सदर बिल जीएसटीसह नसल्यामुळे ते थांबविण्यात आले आहे. यात मागील १४ महिन्यांचे अनुदान जीएसटीअभावी राजस्थान सरकारकडे अडकले आहे. ते त्वरित मिळण्यासाठी स्थानिक पुजाºयाने राजस्थान सरकारशी पत्रव्यवहार केल्याची माहिती देवस्थानकडून देण्यात आली.महाराजा मानसिंहअकबराच्या नऊ रत्नांपैकी एक मुघल सेनापती आमनेर-जयपूर संस्थानचे प्रसिद्ध राजा मानसिंह प्रथम याचा मृत्यू अचलपूरमध्ये झाला. या महाराजा मानसिंह प्रथमच्या स्मृतीप्रीत्यर्थ व सन्मानार्थ एक स्मारक (सेनोटॅफ) याच परिसरात १६१२ मध्ये बांधण्यात आले आहे. या स्मारकाची दुरुस्ती महाराजा सवाई मानसिंह द्वितीयच्या आदेशावरून १९३५ मध्ये केली गेली. राजा मानसिंह प्रथम यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उभारलेल्या दगडी चबुतºयावर एक छोटी मंदिररूपी घुमटी आहे. त्यात महादेवाची पिंड आहे. हीच ‘राजा की छत्री’. या ठिकाणच्या दिवाबत्तीसह भोगराग नैवेद्यमचे अनुदान हनुमानजींच्या अनुदानासोबत राजस्थान सरकारकडून पाठविले जाते. या ठिकाणाची जबाबदारीही हनुमान मंदिरावर नियुक्त पुजाऱ्याकडेच राजस्थान सरकारने सोपविली आहे.राजा जयसिंहमहाराजा मानसिंहचे वंशज राजा जयसिंह यांचा या हनुमान मंदिराशी संबंध असून त्यांच्याच नावाने अचलपूर शहरातील हा जयसिंह (जयसिंग) पुरा आहे. या मंदिर परिसरालगत राजस्थान सरकारच्या मालकीची नझूलची ९० हजार चौरस फूट जागा आहे. या ठिकाणी राजस्थान सरकारच्या पूर्वपरवानगीशिवाय कुणालाही काहीही करता येत नाही. राजस्थान सरकारच्या प्रॉपर्टी अधिकाऱ्यांसह अन्य अधिकारी आजही या क्षेत्राला भेटी देऊन त्याची पाहणी करतात.