शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

‘अड्डा २७’ नोंदणीधारकांच्या मुसक्या आवळल्या

By admin | Updated: July 17, 2017 00:09 IST

"शॉप अ‍ॅक्ट"च्या नोंदणी प्रमाणपत्राचा गैरवापर करणाऱ्या ‘अड्डा २७’ या हुक्का पार्लरच्या प्रोप्रायटरसह अन्य पाच जणांविरुद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : "शॉप अ‍ॅक्ट"च्या नोंदणी प्रमाणपत्राचा गैरवापर करणाऱ्या ‘अड्डा २७’ या हुक्का पार्लरच्या प्रोप्रायटरसह अन्य पाच जणांविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी शनिवारी रात्री गुन्हा नोंदविला. याप्रकरणी मनोज विष्णू बडनखे (४४,वृंदावन कॉलनी, साईनगर) याला पोलिसांनी अटक केली आहे. लोकमत"ने हुक्का पार्लरचे वास्तव लोकदरबारात उघड केल्यानंतर २० मे रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या दुकाने निरीक्षक अर्चना कांबळे यांनी अड्डा २७ विरुद्ध तक्रार दाखल केली होती. ठाणेदार मनीष ठाकरे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीअंती हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी बडनखे व अन्य पाच जणांविरुद्ध भादंविचे कलम ४१७, १७७, १८१, १८८ सह सार्वजनिक ठिकाणी धुूा्रपानास प्रतिबंधक अधिनियम २००८ चे कलम ४, सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने (व्यापार व वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण, जाहिरात आणि विनियमन प्रतिबंध) अधिनियम २००३ च्या कलम ४ मधील तरतुदीनुसार १५ जुलैला रात्री ९.४४ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.बसस्थानक रस्त्यावरील अड्डा -२७ या हुक्का पार्लरच्या आस्थापना मालकाने स्वयंघोषणापत्र व स्वयं साक्षांकित करून सहायक कामगार आयुक्त कार्यालयाला चुकीची माहिती देऊन नोंदणीप्रमाणपत्राच्या आधारे हुक्का व डॉन्स पार्लर चालविले जात होते. बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी हा संतापजनक प्रकार उघड केला होता. त्यानंतर "तोकड्या कपड्यात थिरकतात मुली" या मथळ्याखाली "लोकमत"ने अंबानगरीत नव्याने रुजू पाहणाऱ्या हुक्का पार्लर संस्कृतीवर प्रकाश टाकला होता. बडे मासे गळालातूर्तास हुक्का पार्लर प्रकरणात अड्डा -२७ या आस्थापनेचा "प्रोप्रायटर" मनोज बडनखे याला अटक करण्यात आली. अन्य पाच जणांनाही अटक होण्याची शक्यता आहे. ते लब्धप्रतिष्ठित असल्याने अटकेची कुणकुण लागताच अटकपूर्व जामीन मिळविण्याची धडपड करू शकतात, हे लक्षात घता पोलिसांनी त्यांची नावे उघड केलेली नाहीत. बडनखेने चौकशीदरम्यान काही बड्या मासांची नावे पोलिसांसमोर उलगडली आहेत. सहायक कामगार आयुक्त कार्यालयाच्या दुकाने निरीक्षकांनी दिलेल्या तक्रारीवरून चौकशी सुरू करण्यात आली होती. त्यामध्ये शॉप अ‍ॅक्टचा गैरवापर करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून मनोज बडनखेला अटक करण्यात आली. - मनीष ठाकरे, पोलीस निरीक्षक, शहर कोतवाली पोलीस ठाणे