शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

वरुडमध्ये गारपीट, धामणगावात वादळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 21:26 IST

गहू झोपला, संत्राफळांचे नुकसान : धारणी, चिखलदरा वगळता सर्व तालुक्यांत अवकाळी 

अमरावती : रविवारी दुपारी ४ च्या सुमारास विजांच्या कडकडाटात कोसळलेल्या वादळी पावसाने पिकांची धूळधाण केली. वरूड तालुक्यात गारपिटीसह पाऊस कोसळला. यात संत्राबागांचे मोठे नुकसान झाले. धामणगाव रेल्वे तालुक्यात सायंकाळी ६.३० वाजता दरम्यान झालेल्या वादळी पावसामुळे काढणीला आलेल्या गहू, चना, भाजीपाला व संत्र्याचेही मोठे नुकसान झाले.      वरूड तालुक्यात दुपारी ४.३० च्या सुमारास अचानक ढगाळ वातावरण होऊन विजेसह वादळी पावसाला सुरुवात झाली.  टेंभुरखेडा,  भेमडी,  तिवसा घाट,  पुसला, महेंद्री, पंढरी सह आदी भागात गारपीट झाली. यामधे संत्रा, गहू, चनाचे नुकसान झाले. गहू झोपला, तर संत्रा झाडे वादळाने आडवी झाली. शेंदुरजनाघाट, सातनूर, रवाळा, झटामजिरी, वाई, पुसली, मालखेड येथील शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. धामणगाव रेल्वे तालुक्यातील अनेक गावांत सायंकाळी ६.३० च्या सुमारास विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतातील सवंगणीला आलेला गहू व हरभराचे नुकसान झाले. कोरोनाच्या भीतीमुळे ग्रामीण भागातील शेतमजूर शेतात  जात नाही. दुसरीकडे काढण्यासाठी हार्वेस्टर मिळत नाही. त्यामुळे शेतातील गहू व चना तसाच उभा आहे . या वादळी पावसामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वादळी पावसाने वातावरणात अधिक गारवा निर्माण झाला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जोरात वारे वाहले. ग्रामीण भागात सडा टाकल्यागत रिमझिम पाऊस पडला. चांदूर रेल्वे तालुक्यात वादळी वाºयासह सरी बरसल्या.  भाजी पाला व फळपिकाला जबर फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. धारणी व चिखलदरा वगळता अन्य १२ तालुक्यात अवकाळी पाऊस बरसला. मोर्शी व अचलपूर तालुक्यात रात्री ७.४५ च्या सुमारास वादळी पावसाला सुरुवात झाली. वरू ड तालुक्यातील पुसला, जामठी, उराड, जामगाव, गणेशपूर, पंढरी, सावंगी परिसरात वादळी पाऊस झाल्याने गहू, हरभरा, संत्रा व मका पिकाचे प्रचंड नुकसान झाले.