शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत तीन तालुक्यांत गारपीट; यशोमती ठाकूरांकडून सर्वेक्षणाचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 20:24 IST

धारणी वगळता अन्य तेराही तालुक्यांत बुधवारी उशिरा रात्री व गुरुवारी पहाटे अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला, तर तिवसा, वरूड व मोर्शी या तालुक्यांत बोराच्या आकाराची गार पडली.

अमरावती : जिल्ह्यातील धारणी वगळता अन्य तेराही तालुक्यांत बुधवारी उशिरा रात्री व गुरुवारी पहाटे अवकाळी पाऊस मोठ्या प्रमाणात बरसला, तर तिवसा, वरूड व मोर्शी या तालुक्यांत बोराच्या आकाराची गार पडली. या गारपिटीमुळे या तीन तालुक्यांत खरीप-रबी पिके व फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी १२.४ मिमी पावसाची नोंद झाली. यात तिवसा २७.६, मोर्शी २३.८, चिखलदरा २६.९ तर वरूड तालुक्यात सर्वाधिक ३१ मिमी पावसाची नोंद झाली. या अवकाळी पावसाने कपाशी, तूर, संत्रा, केळी व रबीतील गव्हाचे मोठे नुकसान झाले. जिल्हाधिकारी कार्यालयानुसार, मोर्शी तालुक्यातील ५९ गावांमधील ४५१३ हेक्टरवरील संत्रा, वरुड तालुक्यातील १४० गावांमधील १० हजार ४५९ हेक्टर क्षेत्रावरील संत्रा व कपाशी बाधित झाली.तिवसा तालुक्यातील १७ गावांमधील ३३२० हेक्टरवरील संत्रा, गहू, तूर, चना, कांदा पीक बाधित झाले. तर चांदूर बाजार तालुक्यातील दोन गावांमधील ४६५ हेक्टर क्षेत्रावरील तूर व हरभरा बाधित झाला. एकंदरीत परतीच्या पावसाने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले असताना सलग दोन दिवसांतील अवकाळी पावसाने पुन्हा एकदा शेतक-यांवर संकट कोसळले आहे. राज्याच्या कॅबिनेट मंत्री यशोमती ठाकूर यांनी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचा पंचनामा करण्याचे आदेश महसूल यंत्रणेस दिले आहेत.