शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
3
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
4
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
5
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
6
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
7
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
8
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
9
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
10
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
11
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
12
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
13
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
14
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
15
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
16
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
17
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
18
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
19
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
20
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा

जिल्ह्यात ठिकठिकाणी गारपिटीचा तडाखा

By admin | Updated: March 1, 2016 00:11 IST

रविवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीतून सावरत नाही तोच...

अमरावती/परतवाडा/चांदूरबाजार/ चिखलदरा/तिवसा/धामणगाव रेल्वे : रविवारी झालेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीतून सावरत नाही तोच सोमवारी पुन्हा अचलपूर तालुक्यातील काही भाग व चांदूरबाजार तालुक्याला पुन्हा वादळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले. अचलपूर तालुक्यातील मल्हारा, सालेपूर, नरसरी या गावांना सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास वादळी पाऊस बरसला. चिखलदऱ्यातही मुसळधार पाऊस बरसला. चांदूरबाजारमध्येही सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास पुन्हा गारपिटीसह पाऊस कोसळला. कुऱ्हा, कोंडवर्धा, विलायतपूर, करजगाव, खरपी या गावात सोमवारी सायंकाळी गारपीट झाली. अमरावती तालुक्यातील डवरगाव येथेही गारा पडल्यात. चिखलदरा येथे सोमवारी सायंकाळी मुसळधार पावसाची नोंद झाली होती. तिवसा तालुक्यात सायंकाळी ७.३० वाजता वादळी पाऊस व गारपिटीमुळे शिवणगाव, जावरा, शेंदोळा, शेंदोळा माहोरा व कुऱ्हा गावांत शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले.धामणगावरेल्वे तालुक्यात गारपिटीचा तडाखा आठ गावांना बसला. यामध्ये कावलीवसाड, चिंचपुर, अंजनसिंगी, गव्हानिपानी, अशोकनगर, ढाकुलगाव, गुंजी येथे निंबाच्या आकाराची गार पडली. विद्युत तारा तुटल्याने सर्वत्र अंधाराचे सावट पसरले होते. तालुक्यात संत्रा उत्पादकांची संख्या अधिक असल्याने संत्रा बहराला गळती लागली. गारपिटीची झळ बागायती पिकांनाही बसली. तहसील प्रशासनाने तत्काळ सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.