परतवाडा (अमरावती) : जैन तीर्थक्षेत्र मुक्तागिरीसह बहिरम यात्रा परिसर व कारंजा बहिरम येथे रविवारी दुपारी ४.३० ते ५ वाजता दरम्यान वादळी पावसासह गारपीट झाली. पडलेली गार हरभऱ्याच्या आकाराची होती. विजेच्या कडकडाटासह सुमारे १० ते १५ मिनिटे पाऊस पडला. यात हवेचा वेग अधिक नसल्याने पिकांचे नुकसान टळले.वरूड तालुक्यातील पुसला, राजुराबाजार, लोहदरा, लिंगा परिसरात दुपारी पाचच्या सुमारास अचानक ढग दाटून आले. विजेच्या कडकडाटसह वादळी पाऊस सुरू झाला. पावसाने शेतातील संत्रा गळाला. मका, गहू वादळाने भूईसपाट झाल्याने शेतकरी पुन्हा हवालदिल झाला आहे.चांदूर बाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा येथेही पाच ते सात मिनिटे हलका पाऊस झाला. अमरावती शहरात सायंकाळी सहाच्या सुमारास ढग दाटून आले. सुमारे २० ते २५ मिनिटे शहरातील काही भागात पाऊस झाला.
मुक्तागीरी, बहिरममध्ये गारपीट; संत्रा, मका, गहू पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2020 20:18 IST