शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

पुन्हा पावसासह गारपीट!

By admin | Updated: January 19, 2015 23:57 IST

पश्चिमी विक्षेप आणि पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे यांच्या परस्पर संबंधामुळे पुन्हा विदर्भात पाऊस पडणार असून काही ठिकाणी गारपीट व विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

वैभव बाबरेकर - अमरावतीपश्चिमी विक्षेप आणि पूर्वेकडून वाहणारे उष्ण वारे यांच्या परस्पर संबंधामुळे पुन्हा विदर्भात पाऊस पडणार असून काही ठिकाणी गारपीट व विजेच्या गडगडाटासह पावसाची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. डिसेंबर २०१४ च्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यातील पारा ७.५ डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरला होता. त्यानंतर नववर्षाच्या स्वागताच्यावेळी विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर कमीअधिक प्रमाणात थंडी जाणवली. सद्यस्थितीत थंडीचा जोर कमी झाला आहे. मात्र, तरीसुध्दा बोचऱ्या थंडीचा सामना विदर्भवासियांनी करावा लागत आहे. कमी-अधिक थंडीमुळे नागरिकांची दिनचर्या विस्कळीत झाली असून आता पुन्हा विदर्भात गारपिटीसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मध्य पूर्व बंगालच्या उपसागरात कमी दाबाची द्रोणीय स्थिती निर्माण झाली असून बांग्लादेशावर चक्राकार वारे वाहत आहेत. २० जानेवारीपर्यंत दक्षिण मध्यप्रदेशात थंडीची लाट असल्याने अमरावती जिल्ह्यातसुध्दा थंडी कायम राहणार आहे. किमान तापमान १० डिग्री सेल्सिअसच्या मागेपुढे राहील, त्यामुळे पर्वतीय भागात काही ठिकाणी धुक्याची शक्यता आहे. पश्चिमी विक्षेप आणि पुर्वेकडून वाहणारे उष्ण वारे यांच्या परस्पर संबंधांमुळे २१ जानेवारीनंतर विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यातच काही ठिकाणी गारपिटीसह विजेचा गडगडाट आणि पाऊस कोसळण्यास परिस्थीती अनुकुल असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञांनी वर्तविला आहे. त्यामुळे सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.