अमरावती : डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अंतर्गत श्री. शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती येथील विद्यार्थी सोहम दाते, मंगेश पिंपळे, विशाल उगले, अभिजित कायंदे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत अळणगाव येथे बुधवारी शेतकऱ्यांना युरिया व गूळ यांचा वापर करून चारा उपचार कसा करावा व त्याचे फायदे काय याबद्दल माहिती देऊन प्रात्यक्षिक करून दाखवले. यावेळी साधारणत एक लिटर पाण्यात ५०० ग्रॅम गूळ ५० ग्रॉम मीठ व ९ ग्रॅम युरिया एकजीव करून १ किलो वाळवलेल्या चाऱ्यावर शिंपडून मिश्रण केले. यावेळी गावातील शेतकरी उपस्थित होते. हा चारा गुरांना दिल्यामुळे त्याची पचनशक्ती वाढून त्याना पोषकद्रव्ये मिळतात या कार्यक्रमाकरिता प्राचार्य चिखले, प्रभारी प्राचार्य आर.के.पाटील, कार्यक्रम अधिकारी अभय देशमुख व विषयतज्ज्ञ प्रा. खंडार तसेच इतर प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन केले.
कृषिदुतांनी केले चारा उपचाराबद्दल मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST