शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

पालकमंत्र्यांनी टपरीवर घेतला चहाचा आस्वाद

By admin | Updated: December 23, 2016 00:18 IST

थंडीच्या दिवसांत गरमागरम चहाची टपरी दिसल्यावर कुणाचे मन आकृष्ट होणार नाही.

पथ्रोट दौरा : चहावाल्या विनोदला मिळाली चार कटची शंभरी नरेंद्र जावरे  परतवाडा थंडीच्या दिवसांत गरमागरम चहाची टपरी दिसल्यावर कुणाचे मन आकृष्ट होणार नाही. पण, दस्तुरखुद्द पालकमंत्र्यांनाही टपरीवर चहा घेण्याचा मोह झाला आणि कोणतीही भीड न बाळगता त्यांनी टपरीवर जाऊन चहाचा चक्क आस्वाद घेतला. त्यांचे सहकारी आणि उपस्थित नागरिक एका पालकमंत्र्यांचा हा साधेपणा पाहून अचंबित झाले ते वेगळेच. अचलपूर तालुक्याच्या पथ्रोट दौऱ्यावर असलेले पालकमंत्री प्रवीण पोटे यांचे हे वेगळे रूप बुधवारी सायंकाळी ७ वाजता अनेकांनी पाहिले. पालकमंत्री, बांधकाम व खनीकर्म राज्यमंत्री असल्याने प्रवीण पोटे यांच्या दिमतीला पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि सर्वच विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची फौज. एका आदेशावर कोणतेही काम होईल, अशी स्थिती. मात्र, या सर्व थाटमाटाला फाटा देत पालकमंत्री प्रवीण पोटेंनी सर्वसामान्य माणसाप्रमाणे चहाच्या टपरीवर जाऊन चहा घेण्याची हौस भागवून घेतली आणि आपण अजूनही जमिनीवरच आहोत, याचा परिचय दिला. बुधवारी पथ्रोट येथील विविध कामांचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यासाठी पालकमंत्री कामांचा व्याप असल्याने तब्बल तीन तास उशिरा आले. चार कट शंभरची नोट पथ्रोटमध्ये आल्यावर आर्यसमाज बसस्थानक रस्त्यावर विकासकामांचे लोकार्पण प्रवीण पोटे यांनी केले. शेजारीच असलेल्या विनोद मेश्राम यांच्या सह्याद्री टी-स्टॉलकडे पालकमंत्र्यांची नजर गेली. फलकाचे अनावरण करताच सरळ पालकमंत्री सह्याद्रीवर गेले. विनोद मेश्रामला चहा मागितला. पालकमंत्र्यांच्या सोबत असलेले मेळघाटचे आ. प्रभुदास भिलावेकर, जिल्हा सरचिटणीस गजानन कोल्हे, तालुकाध्यक्ष सुधीर रसे यासर्वांनीन चहाचा आस्वाद घेतला. पालकमंत्र्यांनी खिशातून शंभर रुपयांची नोट काढून विनोद मेश्राम यांना दिली आणि पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले. आणि बेपत्ता आमदार दिसले मेळघाटचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन, लोकार्पण सोहळ्यासाठी पालकमंत्री प्रवीण पोटे यांना सुद्धा आमंत्रित केले होते. आ. भिलावेकर येणार का, हा प्रश्न पथ्रोट गावामध्ये औत्सुक्याचा विषय ठरला होता. मात्र, बुधवारी प्रभुदास भिलावेकर यांचे आगमन होताच परिसरात चर्चेला उधाण आले होते. कारण मेळघाट मतदारसंघात आ. भिलावेकर कधी दिसतच नसल्याची बोंब आहे. मात्र, ते काहीही असले तरी यानिमित्ताने का होईना पथ्रोटवासियांना आ. प्रभुदास भिलावेकरांचे दर्शन झाले, एवढे मात्र निश्चित. यामुळे निवडणुकीची चाहुल लागली.