शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते तिरंग्याला सलामी

By admin | Updated: August 17, 2015 00:09 IST

भारतीय स्वातंत्र्याचा ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले.

ध्वजारोहण : शेतकरी हा केंद्रबिंदू मानून शासनाची भरीव कामगिरीअमरावती : भारतीय स्वातंत्र्याचा ६८ व्या वर्धापन दिनानिमित्त शनिवारी विभागीय आयुक्त कार्यालयात पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. त्यानंतर राष्ट्रगीत व मानवंदना देण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक संजीवकुमार सिंघल, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) लखमी गौतम उपस्थित होते.पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील विकासकामांचा ठळक आढावा घेतला. त्यामध्ये १ लाख ५५ हजार शेतकऱ्यांना १३०० कोटी रुपये पीककर्ज वाटप, ४० हजार शेतकऱ्यांना ३५३ कोटींचे कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले. त्यासोबतच शेतकरी सावकार कर्जमुक्तीकरिता २२ कोटी मंजूर करण्यात आले. पीक विमा योजनेत १ लाख १६ शेतकऱ्यांना ८४ कोटी रुपये पीक विमा मंजूर करण्यात आला. नवीन भूसंपादन कायद्यामुळे शेतकऱ्यांना शेतजमिनीच्या पाचपट वाढीव दर मिळणार असल्याचेही ना. पोटे यांनी सांगितले. जिल्ह्यात दरवर्षी १७५० याप्रमाणे तीन वर्षांत ५२५० विहिरींचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार योजनेत जिल्ह्यात १२ हजार ५०० टी.सी.एम. जलसाठा निर्माण झाला आहे. १० हजारपेक्षा जास्त हेक्टर जमिनीवर सिंचन होणार आहे. उद्योग क्षेत्रात अमरावती जिल्ह्यात टेक्सटाईल पार्कचा शुभारंभ झाला असून २२४० कोटींच्या गुंतवणुकीतून ४७७२ लोकांना रोजार मिळणार आहे. जिल्ह्याचा दुर्गम भाग असलेल्या मेळघाटात सोलर ऊर्जने वीजपुरवठा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या पुढाकाराने ३० हजार कोटींचा मुंबई नागपूर सहापदरी एक्सप्रेस वे प्रस्तापित केला जाणार आहे. शहरातील काँक्रीट रस्ते व पुलाकरिता केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने सीआरएफ फंडामधून ३६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हा विकासासाठी नियोजन समितीने बजेट १५० कोटीवरुन २१८ कोटी केले आहे. अमरावतीचा स्मार्ट सिटीमध्ये समावेश केल्याने शहराचा विकास नियोजित पद्धतीने होण्यास गती मिळेल. जिल्ह्यातील २ लाख शेतकऱ्यांना अन्न, सुरक्षेचे कवच लाभणार आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांना ३ रुपये किलो तांदूळ व २ रुपये किलो गहू याप्रमाणे अन्न सुरक्षा मिळणार आहे. यावेळी आमदार अनिल बोंडे, राजेंद्र गवई, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार, स्वातंत्र्य सैनिक महादेवराव मोरे, राज्य माहिती आयुक्त डी.आर. बनसोड व सर्व विभागांचे महत्त्वाचे अधिकारी, नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)