भाजप कार्यालयात कार्यक्रम : नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहनअमरावती : दिवसेंदिवस होत असलेली वृक्ष तोड यामुळे वनजमिनींचा नाश होत आहे. तसेच त्याचा परिणाम म्हणून दिवसागणिक पावसाचे प्रमाण कमी होत असून राज्याला वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागत आहे, यावर मात करण्यासाठी अर्थमंत्री व वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी १ जुलै संपूर्ण राज्यभरात एकाच दिवशी २ कोटी वृक्षलागवडीचा महत्त्वकांक्षी संकल्प जाहीर केला आहे. त्याचाच भाग म्हणून आज भाजपा कार्यालयात पोटे पाटील यांनी स्व खचार्ने हजारो विविध प्रजातीचे वृक्ष वाटप केले. जिल्ह्यातील सर्व जनतेनी या संकल्पात उत्साहाने सहभागी व्हावे. ज्यांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होणे शक्य नसेल त्यांनी आपल्या घरातील मोकळ्या जागेत व जिथे शक्य असेल अशा मोकळ्या जागेत वृक्ष लागवड करून राष्ट्रोन्नतीच्या या कार्यक्रमात आपला सहभाग नोंदवून आपल्या भावी पिढीच्या उत्तम आरोग्याची, प्रदूषणमुक्त वातावरणाची तरतूद करावी, असे आवाहन राज्याचे पर्यावरण राज्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी गुरुवारी वृक्ष वाटप कार्यक्रमात सर्व जनतेला केले. यावेळी आ. सुनील देशमुख, भाजपक्षाचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांनी केले वृक्ष वाटप
By admin | Updated: July 1, 2016 00:23 IST