शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

हमीभाव ४८९२ तरी शेतकऱ्यांच्या पदरी ३८०० रुपये; उत्पादन खर्च निघणे कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 12:44 IST

Bhandara : तेल महागले, पण सोयाबीन कवडीमोल, खरिपात सर्वाधिक पेरा कशाच्या बळावर?

लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : केंद्र शासनाने २० टक्के आयात शुल्क लावल्यावर सोयाबीनसह सर्वच तेलांच्या दरात २० ते २५ रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे सोयाबीनची दरवाढ होईल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. प्रत्यक्षात ४८९२ रुपये क्विंटल हमीभाव असताना मार्केटमध्ये सोयाबीनला ३८०० ते ४२०० रुपयांपर्यंत भाव मिळत असल्याने उत्पादन खर्च निघणे कठीण आहे. 

बाजार समित्यांमध्ये या आठवड्यात नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली आहे. सद्यस्थितीत १३ ते १४ हजार सोयाबीनच्या पोत्यांची आवक होत आहे. नाफेडमध्ये १२ टक्के आर्द्रतेचा निकष आहे व दोन महिने चुकारे मिळण्याची शक्यता नाही त्यामुळे दिवाळीच्या तोंडावर अडचणीत सापडलेले शेतकरी सोयाबीन विक्रीला आणत आहेत. व्यापाऱ्यांद्वारा सोयाबीनची मातीमोलभावाने खरेदी होत आहे. 

सोयाबीनचा उत्पादन खर्च वाढला आहे. पेरणीपूर्व मशागत ते काढणीपर्यंत एकरी किमान २० हजार रुपयांचा खर्च येतो. यंदा उतारा घटल्याने शेतकऱ्यांच्या हाती पोतभर सोयाबीनही उरत नाही. सोयाबीनला वर्षभर हमीभाव मिळाला नाही. त्यामुळे खरिपात सर्वाधिक पेरा असलेले सोयाबीन संकटात आले आहे. सबब, शेतकरी हवालदिल झाला आहे. 

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची कोंडी आर्थिक अडचणीतील शेतकरी दिवाळीपूर्वी सोयाबीन विक्रीला आणत असताना व्यापाऱ्यांद्वारा शेतकऱ्यांची कोंडी करण्यात येत आहे. सोयाबीन साठवणुकीला पुरेशी जागा नाही, शेतमजुरांचे चुकारे राहिले आहेत. दहा दिवसांवर दिवाळीचा सण आलेला आहे.

सोयाबीनचे बाजारभाव (रु/क्विं) ०९ ऑक्टोबर        ३६०० ते ४२००११ ऑक्टोबर         ३९५० ते ४३९९ १४ ऑक्टोबर         ३८०० ते ४३२५२६ ऑक्टोबर         ३८०० ते ४३००१८ ऑक्टोबर         ३८०० ते ४११२

"नवीन सोयाबीनमध्ये आर्द्रता जास्त आहे. त्यामुळे कमी भाव मिळत आहे. नाफेडमध्ये असे सोयाबीन घेतले जात नाही. त्यामुळे दोन्ही प्रकारांत शेतकऱ्यांची कोंडी होत आहे." - अशोक आवारे, शेतकरी

टॅग्स :AmravatiअमरावतीfarmingशेतीSoybeanसोयाबीनMSP Mandalमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ