शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी ठरली अडथळ्यांची शर्यत! वित्त विभागही संभ्रमित, दीड महिन्यानंतर मार्गदर्शक सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 18:40 IST

संपूर्ण देशात जीएसटी लागू होऊन ५० दिवस उलटले.मात्र, याकरप्रणालीच्या अंमलबजावणीतील संभ्रम ‘सरकार’ दूर करु शकलेले नाही. बांधकामक्षेत्र आणि स्थानिक नागरी संस्थांसाठी ‘जीएसटी’ अडथळ्यांची शर्यत ठरली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीसंदर्भात वित्त विभागाने १९ आॅगस्टला काढलेले परिपत्रकही परिपूर्ण नसून याविभागाने ‘अभिप्राय’ नंतर कळवू, अशी भूमिका घेतली आहे.

-  प्रदीप भाकरेअमरावती, दि. 22 - संपूर्ण देशात जीएसटी लागू होऊन ५० दिवस उलटले.मात्र, याकरप्रणालीच्या अंमलबजावणीतील संभ्रम ‘सरकार’ दूर करु शकलेले नाही. बांधकामक्षेत्र आणि स्थानिक नागरी संस्थांसाठी ‘जीएसटी’ अडथळ्यांची शर्यत ठरली आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीसंदर्भात वित्त विभागाने १९ आॅगस्टला काढलेले परिपत्रकही परिपूर्ण नसून याविभागाने ‘अभिप्राय’ नंतर कळवू, अशी भूमिका घेतली आहे.जीएसटीच्या अंमलबजावणीवर शासकीय कंत्राटांमध्ये होणाऱ्या बदलांच्या अनुषंगाने जीएसटी आकारणीबाबत वित्तविभागाने काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत. यात १ जुलै २१ आॅगस्ट दरम्यान निविदा स्वीकृत केली असली तरी कार्यारंभ आदेश न मिळालेल्या निविदा रद्द करण्याच्या सूचना आहे. याशिवाय १ जुलैपूर्वी जारी करण्यात आलेल्या निविदेवर १ जुलैनंतर कार्यारंभ आदेश देण्यात आला असेल तर त्याप्रकरणांमध्ये कंत्राट रद्द न करण्याच्या सूचना आहेत. या मार्गदर्शक सूचना करीत असताना वित्तविभाग कंत्राटाच्या किमतीबाबत मार्गदर्शन करु शकले नाही. जीएसटीच्या अंमलबजावणीत कराच्या बोझ्यामध्ये होणाऱ्या बदलामुळे कंत्राटाच्या किंमतीत बदलाबाबत विधी व न्याय विभागाचे अभिप्राय स्वतंत्रपणे घेण्यात येतील व ते अभिप्राय प्राप्त झाल्यानंतर संबंधिताना माहिती कळविण्यात येईल, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे. त्यामुळे जीएसटीबाबतचा संभ्रम महापालिका, जि.प. वा बांधकाम खात्यापुरता मर्यादित नसून तो वित्त विभागही निस्तरु न शकल्याचे स्पष्ट झाले आहे. बांधकाम कंत्राटाच्या जीएसटीत संभ्रम१ जुलैपूर्वी निविदांना स्वीकृती दिली असली तरी काम मात्र १ जुलैनंतर सुरु करण्यात आले. ते काम सुरु ठेवण्यात यावे, तसेच त्यांची देयकेही अदा करण्यात यावी, अशा सूचना नव्याने दिल्या आहेत. अशा कामांसंदर्भात द्यावयाच्या देयकांमध्ये जीएसटी अंमलबजावणीमुळे होणाऱ्या कराच्या बोझ्यात होणाऱ्या बदलाबाबत भाष्य करण्यात आलेले नाही. नेमका हाच संभ्रम असताना वित्त विभागाने ती बाब विधी व न्यायविभागाच्या अभिप्रायावर अवलंबून असल्याचे म्हटले आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार