पाण्यात आढळली सापाची कात : ग्रामपंचायतीला ठोकले कुलूपबेनोडा (शहीद) : स्थानिक ग्रामपंचायतीकडून गावाला होणाऱ्या पाणीपुरवठ्याची पाईपलाइन लिकेज झाल्याने वॉर्ड क्र. १ मध्ये लिकेज दुरुस्ती करण्यात आली. परंतु या पाणी पुरवठ्यामधून चक्क सापाची कात आणि गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान ग्रामपचांयत कार्यालयाला कुलूप ठोकल्याचा प्रकार घडला. प्राप्त माहितीनुसार, ग्रामपंचायत बेनोडा (शहीद) येथील वॉर्ड क्र १ मध्ये नालीमधून असलेल्या पिण्याच्या पाईपलाइनमध्ये लिकेज होते. सदर लिकेज दुरुस्त करण्यात येऊन पाणी पुरवठा सुरळीत केला. मात्र नालीतील गढूळ पाणी आणि सापाची कात तसेच कुजलेले मांसाचे तुकडे नागरिकांच्या घरातील नळात आले. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष उफाळून आला. यावेळी नागरिक समस्या सोडविण्यासाठी गेले असता उलटसुलट उत्तरे मिळाल्याने त्यांच्यात तीव्र असंतोष उफाळल्याने शाब्दित बाचाबाचीसुध्दा झाली.
बेनोडा ग्रामपंचायतीकडून गढूळ पाण्याचा पुरवठा
By admin | Updated: July 1, 2015 00:36 IST