अमरावती : आपल्या प्रियजणांना सण-समारंभाच्या शुभेच्छा देण्यासाठी पूर्वी पत्राचा आवर्जून वापर केला जायचा. त्याकाळी तेवढी सुविधा उपलब्ध नसलयाने पत्र हाच एकमेव उपाय असायचा. आता आधुनिक साधनांमुळे संदेश पाठविण्याचे प्रकार बदलले आहेत. मात्र ग्रिटिंग ही पद्धत आजही कायम असून त्याच काळानुरुप 'क्वालिटी' बदलली आहे. माध्यमांद्वारे आॅनलाईन शुभेच्छा देणे सोपे असले तरी ग्रिटिंग कार्डचे आकर्षण आजही आहे. दरवर्षी येणाऱ्या नवनवीन प्रकारांमुळे ग्राहक आजही त्याकडे आकर्षित होत असून दिवाळीनिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ग्रिटिंग कार्ड्स बाजारात दाखल झाले आहेत.ग्रिटिंगचा वापर अनेक वर्षांपासून शुभेच्छा देण्यासाठी केला जात असला तरी काळानुसार त्यात अनेक बदल घडत गेले. ग्रिटिंग कार्ड्स बनविणाऱ्या कंपन्याही नवनवीन तंत्रज्ञान आजमावून काळाप्रमाणे चालत राहिल्याने ग्राहक त्याकडे वेळोवेळी आकर्षित होत गेला. शुभेच्छा देण्याचे माध्यम अधिक प्रभावी व गतिमान होत गेले असले तरी आजही दिवाळीच्या शुभेच्छांसाठी अनेकजण ग्रिटिंग कार्डलाच पसंती देताना आढळते. नाविन्यामुळे ग्रिटिंग कार्ड आजही प्रचलित आहे.
नवमाध्यमांच्या काळातही ग्रिटिंगचे आकर्षण कायम
By admin | Updated: October 22, 2014 23:11 IST