शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
3
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
4
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
5
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
6
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
7
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
8
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
9
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
10
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
11
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
12
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
13
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
14
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
15
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
16
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
17
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
18
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
19
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
20
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका

महामानवाला भावपूर्ण अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 05:00 IST

शहरातील इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यासाठी सकाळपासूनच अनुयायांनी गर्दी केली होती. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी नतमस्तक होत त्यांच्या लोकशाहीधिष्ठित विचारांचे बळ मिळविले. शहरातील विविध नगर-वस्त्यांमध्ये जयंतीनिमित्त उत्साहाचा माहौल सोमवारी रात्रीपासूनच तयार झाला होता.

ठळक मुद्देभल्या पहाटे लागल्या रांगा, पोलिसांकडून पुतळा परिसराला बॅरिकेडिंग, ‘एकच साहेब - बाबासाहेब’, ‘जोर से बोलो जयभीम’चा घोष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, मानवमुक्तीचे प्रणेते, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती शहरात हर्षोल्हासात बुधवारी साजरी करण्यात आली. राजकीय, सामाजिक, स्वयंसेवी संस्था, आंबेडकर चळवळीतील नेते, कार्यकर्त्यांनी महामानवाला अभिवादन केले. शहरातील इर्विन चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हारार्पण करण्यासाठी सकाळपासूनच अनुयायांनी गर्दी केली होती. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून आलेल्या आंबेडकरी अनुयायांनी नतमस्तक होत त्यांच्या लोकशाहीधिष्ठित विचारांचे बळ मिळविले. शहरातील विविध नगर-वस्त्यांमध्ये जयंतीनिमित्त उत्साहाचा माहौल सोमवारी रात्रीपासूनच तयार झाला होता. रात्री १२ वाजताच येथील इर्विन चौक, भीम टेकडी, शेगाव, रहाटगाव, तपोवन, बडनेराच्या नवीवस्तीतील अशोकनगर, पोलीस ठाण्यापुढील पुतळाजवळ फट्याकांची भव्य आतषबाजी करण्यात आली. ढोल-ताशाचा गजर, ‘एकच साहेब - बाबासाहेब’, ‘जोर से बोलो जयभीम’चा घोष आसमंतात निनादत होता. बुधवारी इर्विन चौकात पुतळा परिसरात कोरोना नियमांचे पालन करीत आंबेडकरी अनुयायी जमले. यावेळी स्वयंशिस्त दिसून आली. इर्विन चौक गर्दीने फुलला होता. कोरोनामुळे यंदा आयोजनाचे स्वरूप भव्य नसले तरी छोटेखानी यात्रेचे स्वरूप या परिसराला आले होते.  भगवान गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, रमाई, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा, फोटो, लॉकेट विक्रीसाठी काही स्टॉलवर सजले होते. काही संघटनांनी मिष्टान्न वाटप, शरबत, बुंदी लाडूचे वाटप केले. शासकीय, प्रशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालयांमध्येही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती