शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

प्रगत कृषीतंत्रासाठी शेतक-यांना विदेश दौ-याची संधी, एक लाखापर्यंत मिळणार अनुदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 17:19 IST

प्रगत देशांनी विकसित केलेले कृषीविषयक तंत्रज्ञान व त्याचा शेतीमध्ये अवलंब करून शेती उत्पादनात झालेली वाढ पाहता यासाठी त्या देशातील प्रगत शेतक-यांसोबत येथील शेतक-यांचा प्रत्यक्ष संवाद घडवून याद्वारे शेतक-यांचे ज्ञान वृद्धींगत करणे अन् क्षमता उंचाविण्यासाठी कृषी विभागाद्वारा शेतक-यांच्या परदेश दौ-याचे आयोजन करण्यात येणार आहे.

अमरावती, दि. 28 -  प्रगत देशांनी विकसित केलेले कृषीविषयक तंत्रज्ञान व त्याचा शेतीमध्ये अवलंब करून शेती उत्पादनात झालेली वाढ पाहता यासाठी त्या देशातील प्रगत शेतक-यांसोबत येथील शेतक-यांचा प्रत्यक्ष संवाद घडवून याद्वारे शेतक-यांचे ज्ञान वृद्धींगत करणे अन् क्षमता उंचाविण्यासाठी कृषी विभागाद्वारा शेतक-यांच्या परदेश दौ-याचे आयोजन करण्यात येणार आहे. यंदाच्या वर्षाकरीता १५ सप्टेंबरच्या आत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून अर्ज मागविले आहेत.‘राज्यातील शेतक-यांचे परदेशात अभ्यास दौरे’, या योजनेंतर्गत केवळ उत्पादन व उत्पादकता वाढविणे, हेच ध्येय न राहता उत्पादित शेतमालाची दर्जात्मक सुधारणा करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत महत्त्वाचा आहे. कृषी विस्तार कार्यक्रमाद्वारे शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याकरिता करावयाच्या विविध योजनांसाठी कृषी विभागाद्वारे प्रयत्न करण्यात येत आहेत. ‘राज्यातील शेतक-यांचे अभ्यास दौरे’हा त्याच उपक्रमाचा भाग आहे. यायोजनेत भाग घेण्यासाठी शेतक-यांकडे ‘पारपात्र’ असणे महत्त्वाचे आहे. लाभार्थी हा स्वत: शेतकरी असावा. त्याच्या नावे सातबारा व आठ ‘अ’ उतारा असणे आवश्यक आहे. उता-यावर नोंदविलेले क्षेत्र पिकाखालील असावे, शेतक-यांचे उदरनिर्वाहाचे मुख्य साधन शेतीच असावे व शेतक-याचे वय २५ ते ६० या दरम्यान असावे, या मुख्य अटी आहेत.जिल्हास्तरीय समितीद्वारे शिफारस केलेल्या अर्जांची तपासणी केल्यानंतर शेतक-यांना विदेश दौ-यात पाठविण्याचा अंतिम निर्णय राज्याच्या कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती घेणार आहे. यासाठी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी शेतक-यांनी नजीकच्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा व विहित प्रपत्रात प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.यंदा ईस्त्रायल, जर्मनी, नेदरलँड किंवा आॅस्ट्रेलिया दौरा...शेतक-यांच्या परदेश अभ्यास दौ-यांतर्गत सन २०१७-१८ करीता इस्त्रायल, जर्मनी, नेदरलँड किंवा आस्ट्रेलिया यापैकी एका देशात शेतक-यांचा दौरा राहणार आहे. यासाठी प्रवास खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा एक लाख यापैकी जी कमी असेल ती रक्कम अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. यासाठी शेतक-याजवळ पारपत्र व सातबारा असावा, ही प्रमुख अट आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी