सव्वाकोटी रुपये भरण्याचे आदेश : पाच दिवसांनंतर लिलावअमरावती : कॅम्प मार्गावरील ‘हॉटेल महफिल इन’ आणि ‘ग्रँड महफिल’ला सुमारे १.२८ कोटी रुपयांच्या थकीत करवसुलीसाठी जप्तीची नोटीस पाठविण्यात आली आहे. ‘महफिल इन’ला १ कोटी १५ लाख ८६ हजार ५५० रुपयांसाठी तर ‘ग्रँड महफिल’ला १३ लाख ७१ हजार ६०६ रुपये पाच दिवसात भरायचे आहेत. त्यानंतरही रक्कम न भरल्यास जप्त केलेल्या स्थावर मालमत्तेचा लिलाव करण्यात येणार आहे. वार्ड क्र. २४ मधील महफिल इन आणि ग्रँड महफिल या दोन्ही स्थावर मालमत्ता थकीत करांमुळे जप्त करण्यात आल्या आहेत. हॉटेल महफिल इनमध्ये एकूण २४१८८ चौरस फुट तर ग्रँड महफिलमध्ये २३१४ चौरस फुट अतिरिक्त बांधकाम आढळून आले होते. त्यापोटी १.२८ कोटी रुपयांची वसुली काढण्यात आली होती. ११ मे २०१६ रोजी प्रभाग क्र. १ चे सहाय्यक क्षेत्रिय अधिकारी आणि निरीक्षक, वॉरंट जमादार यांच्या स्वाक्षरीने हा जप्तीनामा प्रसूत करण्यात आला आहे. जप्तीनामा घेण्यास नकारअमरावती : मालमत्ताधारक उपस्थित नसल्याने आम्ही जप्तीनाम्याचे दोन्ही आदेश घेऊ शकत नाही, असा पवित्रा उभय हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी घेतला. त्यामुळे ती नोटीस तेथेच चिटकवण्याचे आदेश दिल्याची माहिती महापालिका सहाय्यक आयुक्त नरेंद्र वानखडे यांनी दिली.
‘महफिल इन’सह ‘ग्रँड महफिल’ जप्त
By admin | Updated: May 13, 2016 00:05 IST