शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

‘आपली परिवहन’ला जीपीएस ट्रॅकिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:31 IST

खासगी अभिकर्त्याकडून चालविण्यात येणाºया ‘आपली परिवहन’ सेवेतील शहर बसेसला जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम लावले जाणार आहे.

ठळक मुद्देमहापालिकेला पत्र : ‘पृथ्वी’वर कारवाईची टांगती तलवार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : खासगी अभिकर्त्याकडून चालविण्यात येणाºया ‘आपली परिवहन’ सेवेतील शहर बसेसला जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम लावले जाणार आहे. याबाबत महापालिकेच्या कार्यशाळा विभागाने पृथ्वी टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्सला पत्र दिले असून, महिन्याअखेरीस शहर बसमध्ये ट्रॅकिंग सिस्टीम कार्यान्वित होईल.महापालिका क्षेत्रात शहर बस चालविण्याकरिता महापालिकेने स्थानिक पृथ्वी टूर्स अ‍ॅन्ड ट्रॅव्हल्ससोबत करारनामा केला आहे. शहर बसेसच्या माध्यमातून महापालिकेला पृथ्वी ट्रॅव्हल्सकडून ६ ते ६.५० लाख रॉयल्टी मिळते. तूर्तास महापालिका हद्दीतील १६ रस्त्यांवर २५ शहर बस धावतात. मात्र, पृथ्वी ट्रॅव्हल्सने करारनाम्याप्रमाणे आणखी १५ बस अद्यापही आणल्या नाहीत. याशिवाय शहर बस सेवेविरोधात तक्रारींचा ओघ वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर बसचे आॅनस्पॉट इन्स्पेक्शन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले होते. त्यातही अनेक त्रुट्या आढळून आल्या होत्या. वेळापत्रकाप्रमाणे मंजूर असलेल्या मार्गावर शहर बस धावत नसल्याचे, वाहकांजवळ तिकिटांचे योग्य सिरीज नसल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले होते. बसेससह डिस्प्ले बोर्डची स्थितीही तपासण्यात आली होती. या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर ‘पृथ्वी’च्या २५ बसेसला जीपीएस ट्रॅकिंग सिस्टीम लावण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून, ते कार्यान्वित करण्यासाठी पृथ्वी टूर्सला पत्र दिले आहे. जीपीएस ट्रॅकिंग कार्यान्वित झाल्यानंतर प्रत्येक शहर बस मोबाइलवर ‘लोकेट’ करता येणे शक्य आहे. आयुक्त, उपायुक्त आणि परिवहन अभियंता यांच्या मोबाइलवर शहर बसचे लोकेशन कळेल. कुठली बस कुठल्या मार्गावर धावत आहे, हे मोबाइलवर कळू लागल्याने अभिकर्त्याच्या अनियमिततेला चाप बसेल.महिन्याअखेरीस सिस्टीम कार्यान्वितशहरात धावणाºया बसेसला ‘इनबिल्ट ट्रॅकिंग सिस्टीम’ आहे. ते केवळ कार्यान्वित करणे गरजेचे आहे. त्या सिस्टीममध्ये केवळ ‘सिम’ टाकून अ‍ॅक्टिवेट झाल्यानंतर बसेसचे लोकेशन मोबाइलवर दिसू लागेल. त्यासाठी आम्ही पृथ्वी टूर्सशी व टाटा कन्सल्टंसीशी पत्रव्यवहार केला आहे. महिन्याअखेरीस ही यंत्रणा सुरू होणार असल्याची माहिती कार्यशाळा विभागाचे उपअभियंता स्वप्निल जसवंते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.