शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

दोन तपापासून 'आदिवासी गोवारी'ची झोळी रिकामीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 10:47 IST

१५ एप्रिल १९९५ रोजी शासनाने आदेश काढून गोवारी जमातीला सवलतीपासून वंचित ठेवले. यादरम्यान २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मोर्चात ११४ निष्पाप गोवारीचा बळी गेला.

ठळक मुद्देआज शहीद गोवारी स्मृतिदिनचार पिढ्या आरक्षणासाठी गारद

मोहन राऊत

लोकमत न्यूज नेटवर्क

अमरावती : स्वातंत्र्यपूर्व काळापासून आदिवासी असताना शासनाने चुकीचे अध्यादेश काढले. त्यात राजकीय अनास्थेसोबतच लालफीतशाहीच्या खेळात ११४ गोवारींचा बळी गेला. एका न्यायालयाने आदिवासी ठरविले, मात्र दुसऱ्या न्यायालयाने पुन्हा वेगळा निर्णय दिल्याने आता राज्यातील या आदिवासी गोवारींनी राष्ट्रपतींना साकडे घातले आहे.

आदिवासी गोवारी समाज हा विदर्भात मोठ्या संख्येने आहे स्वातंत्र्यपूर्व काळापासून या जमातीला आदिवासींच्या सवलती मिळत असताना १५ एप्रिल १९९५ रोजी शासनाने आदेश काढून गोवारी जमातीला सवलतीपासून वंचित ठेवले. यादरम्यान २३ नोव्हेंबर १९९४ रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या मोर्चात ११४ निष्पाप गोवारीचा बळी गेला. तद्नंतर या जमातीला आदिवासींच्या सवलतींपासून वंचित ठेवत विशेष मागास प्रवर्गाच्या सवलती देण्यात आल्या. मात्र, या जमातीला सवलतीचा लाभ झाला नाही.

औटघटकेचे मिळाले आरक्षण

आदिवासी गोवारी हे आदिवासी असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयांच्या नागपूर खंडपीठाने १४ ऑगस्ट २०१८ मध्ये दिला. ही जमात खऱ्या अर्थाने समाजप्रवाहात येत असताना राज्य शासनाच्या आदिवासी विभागाने उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली. सर्वोच्च न्यायालयाने गोवारी आदिवासी नसल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे गोवारी जमात पुन्हा सवलती पासून वंचित झाली आहे.

हातात घेतलेय आता तीर अन् कमान

आमची आदिवासींची संस्कृती आहे, हे आम्ही न्यायालयाला सिद्ध करून दाखविले. सवलतींसाठी तीन पिढ्या गारद झाल्या. नेहमी सवलतीत राजकरण आडवे येते आणि आम्हाला वंचित ठेवले जाते. त्यामुळे थेट राष्ट्रपती भवना समोर उपोषणाचा इशारा या जमातीतील युवा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

राज्य शासनातील आदिवासी आमदार विधानसभा मतदार संघातून आमच्या मतावर निवडून येतात. मात्र, आम्ही आदिवासी असताना आम्हाला विरोध करतात. हा कुठला न्याय आहे? पुढील महिन्यात राष्ट्रपती भवनासमोर बेमुदत उपोषणाला बसण्याचा आमचा निर्धार आहे.

- नंदू सहारे, प्रदेशाध्यक्ष, आदिवासी गोवारी युवा शक्ती संघ, अमरावती

टॅग्स :Socialसामाजिक