शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
2
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
3
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
4
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
5
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
6
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
7
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
8
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
9
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
10
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
11
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
12
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
13
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला
14
विजेच्या धक्क्याने गमावले हात, हिंमत हारला नाही; आता करतो फूड डिलिव्हरी अन् रात्री कॅलिग्राफी
15
जाळपोळ, तोडफोडीसह नेपाळ पेटलं! हजारो युवक रस्त्यावर उतरले; आतापर्यंत १४ मृत्यू ८० हून अधिक जखमी
16
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात ४ ग्रहांचे गोचर ७ राशींना लाभ; धनलाभाची पुरेपूर संधी, नशिबाचीही साथ
17
VIDEO: क्लासिक!! धोनीने रांचीच्या रस्त्यावर चालवली व्हिंटेज आलिशान 'रॉल्स-रॉयस'; चाहते खुश
18
हॉटेल आणि रेस्टॉरंटमधील जेवणावरचा GST दरात कपात! १ लाखाचे पॅकेज मिळणार ८०,००० हजारात
19
रॉकेट बनला 'हा' शेअर, रणबीर कपूर-दामानींसह अनेक दिग्गजांची खरेदी
20
जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार

राज्यपालांचा दौरा; आदिवासी विकास विभाग लागला कामाला

By admin | Updated: October 29, 2015 00:37 IST

राज्यपाल विद्यासागर राव २ नोव्हेंबर रोजी मेळघाटच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनासह आदिवासी विकास विभागाने आढावा बैठकी घेण्याचे सत्र युद्धस्तरावर चालविले आहे.

बैठकांचे सत्र सुरु : प्रभारी अप्पर आयुक्तांनी घेतला आढावाअमरावती : राज्यपाल विद्यासागर राव २ नोव्हेंबर रोजी मेळघाटच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनासह आदिवासी विकास विभागाने आढावा बैठकी घेण्याचे सत्र युद्धस्तरावर चालविले आहे. कुपोषण, बाल, मातामृत्यू रोखण्यासाठी आतापर्यंतच्या उपाययोजनांची आकडेवारी जुळविली जात आहे.राज्यपाल राव यांचा मेळघाट दौरा निश्चित होताच जिल्हा प्रशासनातर्फे विभागनिहाय बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनीे संपूर्ण विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेऊन आतापर्यंत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती संकलन करण्यास प्रारंभ केला आहे. मेळघाटला कुपोषणाचा लागलेला कलंक पुसून काढण्यासाठी शासन योजनांची अंमलबजावणी करुन माता व बालमृत्यू रोखण्यास खरेच यश मिळाले काय? ही वस्तुस्थितिजन्य आकडेवारी राज्यपालांच्या पुढ्यात जिल्हाधिकाऱ्यांना ठेवायची आहे. त्यामुळे आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग तसेच आदिवासी विकास विभागाला लक्ष्य करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी गित्ते यांनी घेतलेल्या आढावा बैठकीला आदिवासी विकास विभागाच्या प्रभारी अप्पर आयुक्त माधवी खोडे देखील आवर्जुन उपस्थित होत्या. वर्षभरात मेळघाटात कुपोषणासंदर्भात काही सुधारणा झाली अथवा नाही, हे प्रशासन आढावा बैठकातून जाणून घेत आहे. दरम्यान आदिवासी विकास विभागाच्या प्रभारी अप्पर आयुक्त माधवी खोडे बुधवारी धारणी दौऱ्यावर होत्या. त्यांनी आदिवासी आश्रम शाळा, वसतिगृहे, महाविद्यालयांचा दौरा करुन माहिती जाणून घेतली.